अँडटीव्हीचे नवीन चॅनल रिफ्रेश अभियान ‘है खास हर अंदाज’
~ अलीकडेच सुरू केलेल्या परफेक्ट पतीनंतर वाहिनीने आणले आहेत आणखी दोन
भव्य कार्यक्रम: रिअॅलिटी शो लव्ह मी इंडिया आणि महामालिका विक्रम बेताल की रहस्यगाथा ~
मुंबई, १९ सप्टेंबर, २०१८: संशोधक & संगीतप्रेमी,
खवय्ये & बायकर्स, सीईओ & साहसाच्या शोधातील भटके, गृहिणी & उद्योजक, तंदुरुस्तीची
आस लागलेले & कलावंत- नवीन भारतीय
म्हणजे हे सगळे आणि आणखी काही. बहुअंगी व्यक्तिमत्वे आणि आवडी
कायमच अस्तित्वात होत्या पण फरक एवढाच आहे की आज लोक त्यांच्यातील प्रत्येक अंगाला
सामोरे जाण्यासाठी इच्छुक आहेत, एका अंगासाठी दुसऱ्याचा त्याग
करणे त्यांना मान्य नाही. समाजाच्या आपल्याकडून असलेल्या मर्यादित
अपेक्षा पूर्ण करून स्वस्थ बसणे नाकारून आपण आपल्या बहुविध भूमिका आणि चेहरे लीलया
मिरवतो. नवीन &dianच्या याच गुणवैशिष्ट्याला
&TV आपल्या नवीन मालिका आणि वाहिनी अभियानाच्या माध्यमातून
हात घालत आहे.
२०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून
&TV वाहिनीने प्रेक्षकांना घट्ट बांधून ठेवण्यात
यश मिळवले आहेत. अत्यंत वेगळ्या आणि अपारंपरिक कथा, व्यक्तिरेखा आणि मूल्य वाहिनीने सादर केली आहेत. वाहिनीवरील
प्रमुख मालिका भाभीजी घर पर हैला प्रेक्षकांचे अमाप प्रेम लाभले आहे.
याचे श्रेय यातील भाभीजींना जाते. मेरी हानीकारक
बिवीमधील कथा चर्चेचा विषय झाली आहे आणि यातून एक खुल्या
विचारांची पत्नी दाखवण्यात आली आहे.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यात वाहिनी अजिबात कचरलेली नाही,
मग ते बढो बहूतून १०० किलोची बहू टीव्हीवर आणणे असो किंवा
कान्हा व राधाला वेगळ्या पद्धतीने सादर करणे असो. &TV वाहिनीने
लाल इश्कसारख्या मालिकेतून अद्भूत प्रणय दाखवून आपल्या कक्षा आणखी विस्तारल्या
आहेत. वाहिनीवरील वैविध्यपूर्ण कथांना नवीन पिढीतील प्रेक्षकांनी
उत्तम प्रतिसाद दिला आहे आणि ब्रॅण्ड रिफ्रेश करत संपूर्ण नवीन मालिकांचा नजराणा आणत
वाहिनी आणखी पुढे पावले टाकत आहे.
झेडईईएल- इंडिया ब्रॉडकास्ट बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत मिश्रा
म्हणाले, “भारतातील पहिल्या क्रमांकाचे मनोरंजन नेटवर्क
म्हणून प्रत्येक वर्गातील प्रेक्षकाच्या मनोरंजनाच्या मागण्या पूर्ण करण्याचा आमचा
प्रयत्न असतो. झेडईईएल समूहातील सर्वांत नवीन जीईसी असलेली &TV
वाहिनी &diansच्या ,अर्थातच
आणखी काहीतरी हवे असणाऱ्या बहुअंगी, प्रगतीशील, तरुण शहरी प्रेक्षकांच्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी
सर्वांत योग्य आहे. आमच्या
वेगळ्या ब्रॅण्ड दृष्टिकोनातून विकसित केलेल्या कंटेंटच्या जोरावर &TV टीमने घडवलेल्या कथा आणि व्यक्तिरेखांच्या प्रेमात &dians नक्कीच पडतील.”
झेडईईएलच्या सीएमओ प्रत्युषा
अगरवाल म्हणाल्या, “आमच्या समूहातील &
ब्रॅण्डचे उद्दिष्ट
आहे प्रस्थापित नियम न मानणाऱ्या &dian मानसिकतेला भावणारा व मनोरंजनाच्या चाकोऱ्या मोडणारा कंटेंट देणे. आमचे नवीन ब्रॅण्ड अभियान ‘है खास हर अंदाज’ एका साध्या तत्त्वावर आधारलेले आहे. ते म्हणजे आजचे भारतीय
त्यांचे विचार, कृती, महत्त्वाकांक्षा यांच्याबाबत
बहुआयामी आहेत आणि ते आयुष्यात अनेक भूमिका अखंडितपणे आणि उत्तम निभावतात. त्यांचे सगळे जग & अर्थात आणि या शब्दाभोवती गुंफलेले
आहे, पर्यायांना किंवा OR या शब्दाला त्यांच्या लेखी फार महत्त्व नाही.
ते प्रत्येक नात्याची मागणी पूर्ण करताच, स्वत:ची आणि स्वत:च्या कामाची कदर ठेवतात, समाजाच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मार्गात आणि अर्थात आणखी असे
जे काही असेल ते प्रत्यक्षात आणतात.
&dianची आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी समोरचा पट विस्तारण्याची क्षमता आणि वैविध्यपूर्ण
छटा पूर्ण वैभवानिशी प्रत्यक्षात आणणारी कल्पनाशक्ती आम्ही या अभियानाच्या माध्यमातून
साजरी करत आहोत.”
हे गाभ्याचे तत्त्व प्रेक्षकांसमोर
आणण्याचे काम करत आहे लॉव लिंटासने विकसित केलेली नवीन चॅनल रिफ्रेश कॅम्पेन. याची सुरुवात येत्या वीकेण्डपासून होत असून यातील पहिला कार्यक्रम
म्हणजे नवीन लहान मुलांसाठी लाइव्ह सिंगिंग रिअॅलिटी शो लव्ह मी इंडियापासून होणार
आहे. &TV वाहिनीवरून येत्या शनिवारी रात्री ९.०० वाजता या शोचा पहिला भाग प्रसारित होईल.
नवीन वाहिनीच्या ‘है खास हर अंदाज’ या विचाराचे सार आणणाऱ्या
उत्कंठावर्धक मालिकांची जंत्रीच &TV वाहिनी येत्या काही महिन्यात
सादर करणार आहे. यातील परफेक्ट पती नुकतीच सुरू करण्यात आली.
याशिवाय दोन मोठ्या बजेटच्या कार्यक्रमांसोबतच आणखी काही मालिकाही सुरू
होणार आहेत.
परफेक्ट पती या मालिकेमधून
राज्यश्री राठोड या भूमिकेतून जयाप्रदा प्रथमच टेलीव्हिजनवर येत आहेत. एक बहुअंगी, प्रगतीशील स्त्री आणि समाजावर
प्रभाव टाकणारी नवीन युगातील सासू राज्यश्री राठोड तिच्या आईपणाच्या प्रवासात एका तीक्ष्ण
प्रश्नाला सामोरी जाते. तो म्हणजे तिचा मुलगा एक परिपूर्ण पती
होऊ शकेल का?
नॉन-फिक्शन विभागात &TV लहान मुलांचा लाइव्ह
सिंगिंग रिअॅलिटी शो लव्ह मी इंडिया लाँच करणार आहे. भारतातील रिअॅलिटी टीव्ही शोंच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षकांना सर्वाधिक मतदानाचे
हक्क देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये
प्रेक्षक ऑडिशन्सच्या टप्प्यापासून ते शोचा विजेता निवडण्याच्या टप्प्यापर्यंत त्यांचा
सर्वांत आवडता गायक निवडू शकणार आहेत. या शोमध्ये गुरू रंधावा,
हिमेश रेशमिया आणि नेहा भसीन हे तीन उत्कृष्ट
संगीतज्ज्ञ परीक्षक म्हणून एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे विभागीय
कॅप्टन्स म्हणूनही चार अत्यंत प्रतिभावंत कलावंत जबाबदारी निभावणार आहेत. हे चार कॅप्टन्स म्हणजे अभिजित सावंत, अनुषा
मणी, भूमी त्रिवेदी आणि नवराज हंस.
फिक्शन विभागातील कार्यक्रमांची
श्रेणी आणखी विस्तारत वाहिनी विलक्षण काल्पनिक कथा विक्रम बेताल की रहस्यगाथा आपल्या
अनोख्या ‘अंदाजा’सह सादर करणार आहे. हा वाहिनीच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी
प्रकल्पांपैकी एक असून, वाहिनीवर संकल्पनेच्या धर्तीवर आजपर्यंत
कधीही न दिसलेली भव्यता या मालिकेतून दिसणार आहे. धाडसी राजा विक्रम आणि चतुर वेताळ यांच्या खिळवून ठेवणाऱ्या जगातील अलौकिक
कथांच्या माध्यमातून ही मालिका अभिजात कथा आधुनिक वळण देत सादर करणार आहे. यामुळे या कथा सध्याच्या काळालाही लागू पडतील आणि चांगल्या-वाईटातील वैश्विक संघर्ष त्यातून आकाराला येईल. याचा
वेगळेपणा आणखी वाढवत टेलीव्हिजनवर प्रथमच वाईटाचा सारांश असलेला भ्रदकाल सादर केला
जाणार आहे.
&TV वाहिनीचे प्रमुख विष्णू शंकर म्हणाले,
“समाज जसा विकसित होतो आणि लोकांच्या आचरणात प्रगती
होते, तसा आम्ही हा बदल टिपून त्याचे प्रतिबिंब मनोरंजनात आणतो
आणि अशा प्रकारचे मनोरंजन आमच्या प्रेक्षकांना देतो. &TV वाहिनीच्या स्थापनेपासूनच आम्ही लोकसंख्याशास्त्रावर नव्हे, तर मनोविज्ञानावर भर देत आलो आहोत. आधुनिक उमलत्या विचारधारेला
आम्ही लक्ष्य केले आहे. आमचे नवीन ब्रॅण्ड अभियान आजच्या &dianना सलाम करणारे
आहे. आम्ही जसे पुढे जात राहू तशा आणखी ‘खास’ कथा सादर करत राहू आणि आमच्या अनोख्या ‘अंदाजा’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आमच्या ब्रॅण्डचे
घोषवाक्य प्रत्यक्षात आणू.
&TV जसा पुढे जात राहील आणि अधिक उंची
गाठत जाईल, तसतशी आगामी काही महिन्यांत वाहिनीची ओळख कॉण्टेण्ट
डिझाइन आणि उत्कंठावर्धक मालिकांतून स्पष्ट होत जाईल. यामुळे
&TVच्या ‘है खास हर अंदाज’ या घोषवाक्याचा आनंद घेण्यास व कौतुक करण्यास प्रेक्षकांना प्रोत्साहन मिळेल.
&diaचा प्रत्येक ‘खास अंदाज’ साजरा
करणाऱ्या &TV परिवारात सामील व्हा!
About &TV:
&TV
is the flagship Hindi GEC amongst the ‘&’ bouquet of channels from Zee
Entertainment Enterprises Limited (ZEEL), a global media and entertainment
company. Staying true to the personification of the Ampersand, &TV
signifies a conjunction of aspirations and rootedness which is synonymous with
the spirit of New Age India. Through its content offering, the channel brings
together people and ideologies thus fostering cohesive viewing within Indian
households. &TV showcases a diverse and dynamic mix of relatable fiction,
high voltage non-fiction, marquee events and blockbuster movies. The channel is
available in SD and HD across all Cable and DTH platforms and enjoys a leading
presence in international markets including Asia Pacific, Europe, the Middle
East and Americas. The channel, viewed by premium audience is fast gaining
popularity across territories.
You
can keep abreast of all &TV shows on social media platforms like Twitter -
@AndTVOfficial; Facebook – AndTVOfficial and Instagram – andtvofficial.
For further
information, please contact:
&TV
Jigna Shah
Mobile:
9920598697
|
Genesis
Burson-Marsteller
Srishti Singh
Mobile: 8879970856
|