Wednesday, September 26, 2018

देशाच्या पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यासाठी गोवा टुरिझमचे योगदान
गोव्याला गेल्या वर्षात ७ लाख पर्यटकांनी भेट दिली


मुंबई, २६ सप्टेंबर २०१८ – तंत्रज्ञान सातत्यने प्रगती करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम घडवून आणत आहे. पर्यटन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बिग डेटापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअलिटीपर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातले सध्याचे ट्रेंड या क्षेत्रातील ग्राहकांच्या अपेक्षा आणि वागणुकीनुसार बदलत आहेत. देशाच्या पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यासाठी गोवा टुरिझम महत्त्वाचे योगदान देत आहे. उदा. गोवा टुरिझमने राज्यभरातील पर्यटन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (जीटीडीसी) गोवामाइल्स ही ऍप वर आधारित टॅक्सी सेवा नुकतीच लाँच केली. या उपक्रमामुळे पर्यटक तसेच स्थानिक गोवन नागरिकांना परवडणाऱ्या, मान्यताप्राप्त दरात व त्याच सोयीनुसार टॅक्सी उपलब्ध होते.

जीटीडीसीने ई- कॉमर्स पोर्टल आणि अँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्मवर मोबाइल अप्लिकेशनही लाँच केले आहे.  जे पर्यटकांना गोव्याचा डिजिटल अनुभव देतात. या वेब पोर्टलद्वारे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना हॉलिडे पॅकेजेस, हॉटेलचे आरक्षण, साहसी सहली, मसाल्याच्या बागा आणि वॉटर पार्क्ससारख्या ठिकाणे जाणून घेता येतात. लाँच झाल्यापासून गोवा टुरिझमला गोव्यातील पर्यटन उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना आपल्या उत्पादनांचे एकाच सर्वसमावेशक व्यासपीठावर विपणन करणे शक्य झाले आहे. या वेब पोर्टलला आता १२ तास सुरू राहाणाऱ्या कॉल सेंटरचीही जोड देण्यात आली आहे.

गोव्याची ‘मस्ट व्हिजिट’ अशी प्रसिद्धी करण्यासाठी गोवा टुरिझमने नुकतेच डिजिटल व सोशल मीडिया व्यासपीठावर ‘टुरिझम बाय टुरिस्ट’ हे अभियान लाँच केले. ते लाँच करण्यासाठी गोवा टुरिझमने ५०० हौशी फोटोग्राफर्स (क्राउड सोर्सर्ड इन्स्टाग्राम अक्टिव्हिटी #PickMyGoaPic), १०० पेक्षा जास्त ब्लॉगर्स आणि ३० युट्यूब कंटेट क्रिएटर्सबरोबर गोव्यात फिरून व्हिडिओज, पिक्चर्स, ब्लॉग्ज असा विविध प्रकारचा कंटेंट तयार करण्यासाठी भागिदारी केली. गोव्याची ‘मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन’ अशी प्रसिद्धी करण्यासाठी हा सर्व कंटेट एका आकर्षक व्हिडिओमध्ये रुपांतरित करण्यात आला. या अभियामानामुळे पेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्स कितीतरी पटींनी वाढले आहेत. या अभियानाला २०१७ मध्ये राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळा, पर्यटन मंत्रालय, भारताद्वारे बेस्ट युज ऑफ सोशल मीडिया इन प्रमोशन ऑफ अ टुरिझम बोर्डचा गोल्ड पुरस्कारही देण्यात आला होता. या डिजिटल अभियानाला कम्युनिकेशन क्षेत्रातील इतरही बरेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

पर्यटन विभाग, गोवा सरकारने संपूर्ण पर्यटन व्यवसाय ई- नोंदणीअंतर्गत आणला असून त्यामुळे नोंदणी आणि परवाना नूतनीकरण प्रक्रिया जास्त पद्धतशीर झाली आहे. स्थआनिक पर्यटन भागधारकांना आता त्यांच्या अर्जाची प्रगती ऑनलाइन तपासता येते आणि एसएमएसद्वारे त्याची अद्यावत माहिती मिळवता येते. जीटीडीटी रेसिडन्सीज विशेषतः पणजी रेसिडेन्सीने टेकसॅव्ही पर्यटकांसाठी नव्या सुधारित सुविधाही उपलब्ध केल्या असून त्यात ई- बुकिंग आणि ई- पेमेंट सुविधांचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत ब्रोशरव्यतिरिक्त ई- साहित्याद्वारे पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी गोवा टुरिझमने जीआयएस मॅपिंगचा प्रस्तावही मांडला आहे.

जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, ‘डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने आणि विपणन आणि प्रचार उपक्रमांमध्ये मोठा बदल केल्याने एकंदरीतच गोवा टुरिझममध्ये लक्षणीय बदल घडून आल्याचे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. इतर पर्यटन महामंडळांकडून तीव्र स्पर्धा असताना गोवा टुरिझम जगभरात सर्वत्र पोहोचण्यासाठी आपली व्याप्ती वाढवत असून या प्रयत्नांना यश मिळत आहे. अंतर्गत प्रक्रियेपासून पर्यटन सेवांपर्यंत सर्व बाबींचे डिजिटायझेशन करत गोवा टुरिझमने डिजिटल रुपांतरणाचा मोठा पल्ला पूर्ण केला आहे. आमचे पर्यटन भागीदार आणि घटकधारक तसेच गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांला गोवा टुरिझमचा सुखद अनुभव मिळेल अशी मी आशा करतो.  त्याचबरोबर या डिजिटल प्रवासात महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी पर्यटन विभाग आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे त्यांनी केलेले पूर्ण सहकार्य, मेहनत आणि उत्साहासाठी मी अभिनंदन करतो.’

माननीय उर्जा मंत्री, गोवा सरकार आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष श्री. निलेश काब्राल म्हणाले, ‘टुरिझम व डिजिटल रुपांतरण क्षेत्रात गोवा पर्यटन विकास महामंडळ चांगली कामगिरी करत असून त्यांची नवीन, ऍप आधारित टॅक्सी सेवा याची प्रचिती देणारी आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव उंचावण्यासाठी बांधील असलेल्या महामंडळाने पर्यटकांना गोव्यात फिरण्यासाठी वाहतुकीचा सोयीस्कर व स्वस्त पर्याय मिळावा यासाठी प्रचंड मेहनत करून ऍप आधारित टॅक्सी सेवा लाँच केली आहे. पर्यटन व्यवसायाला सेवा देण्यासाठी गोवामाइल्स सज्ज असून ही नवी सेवा पर्यटकांना गोव्याला भेट देण्यासाठी आणि हे राज्य बघण्यासाठी प्रोत्साहन देईल. डिजिटल व्यासपीठांद्वारे प्रचलित करण्यात आलेली आमची इतर उत्पादने आणि सेवाही यशस्वी ठरल्या असून जागतिक पातळीवर गोवा टुरिझमचा प्रसार करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे योग्य वापर करता येईल हे दर्शवणारी आहेत. हे सर्व बदल चांगले परिणाम साधत असून गोव्याला गेल्या वर्षात ७ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. मला खात्री वाटते, की पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होत असताना नवा अनुभव देणाऱ्या या सर्व सेवांचा पर्यटक लाभ घेतील. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मी सर्व पर्यटन भागधारक आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि गोवा टुरिझमचा झेंडा असाच उंच ठेवण्यासाठी चांगले काम करत राहाण्याची विनंती करतो.’

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...