Friday, September 28, 2018

                 हास्यजत्रेच्या मंचावर साजरा झाला सईच्या आईचा वाढदिवस

मुंबई म्हणजे कामात व्यस्त असणारं शहर... या कामाच्या व्याप्यात आपली माणसं बऱ्याचदा दुरावतात... आपल्या सेलिब्रिटीज् च्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच घडते. राहत्या ठिकाणाहून या मायानगरीत येऊन, आपलं स्थान निर्माण करायचं आणि त्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी धडपड करायची. या सगळ्यात आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती...म्हणजे आपले 'आई-बाबा' यांच्यासाठी वेळ काढणं ही कठीण होऊन बसतं...मात्र आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या आई-बाबांचं आपल्या आयुष्यातलं स्थान साजरं करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी ही पुरेशा असतात, हे सोनी मराठीवर सुरूअसलेल्या हास्यजत्रेची जज् आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पटवून दिलं आहे.

हास्य जत्रेच्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरने वेळात वेळ काढून आपल्या आईच्या वाढदिवशी तिला बोलावून या मंचावर केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्या माऊलीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद वेगळाच होता. सई बरोबरच हास्यजत्रेचे दुसरे जज् प्रसाद ओक, एंकर प्राजक्ता माळी तर समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे - संभेराव, प्रसाद खांडेकर तसेच या शोची संपूर्ण टीम उपस्थिती होती.

विणूया अतूट नाती म्हणणाऱ्या सोनी मराठी या नव्या वाहिनीच्या या हास्यजत्रेत नव्याने नाती विणताना जुनी नाती सांभाळणं किती महत्त्वाचं असतं, याचे धडे नकळत मिळत आहेत. या एकंदरवातावरणामुळे संपूर्ण हास्य जत्रा खुलत चालली आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain

  ‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain aka JJ Communi...