Friday, September 28, 2018

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्या गोव्याला आणखी एक सन्मान – पर्यटनाच्या सर्वसमावेशक विकासासाठीचा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान (उर्वरित भारत)

पणजी, २७ सप्टेंबर – देशाच्या राजधानीत आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्यात गोव्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा सर केला असून राज्याला २०१६- १७ साठीचा पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास (उर्वरित भारत) हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माननीय केंद्रीय पर्यटन मंत्री श्री. अल्फान्स कनंथानम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार माननीय पर्यटन मंत्री, गोवा सरकार, श्री. मनोहर आजगांवकर यांनी जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. निखिल देसाई यांच्यासोबत श्रीमती रश्मी वर्मा (आयएएस) य पर्यटन सचिव, भारत सरकार यांच्या सन्माननीय उपस्थितीत स्वीकारला. 

यंदा सलग दुसऱ्या वर्षी गोव्याने प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार स्वीकारला आहे. त्याचबरोबर गोव्याने पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास (उर्वरित भारत) विभागात पुरस्कार मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.


आज २७ सप्टेंबर २०१८ रोजी असलेल्या जागतिक पर्यटन दिनाच्य निमित्ताने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात आजचा हा पुरस्कार देण्यात आला. १९९० मध्ये एनटीए पुरस्कारांची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून राज्य सरकार/युटी आणि इतर पर्यटन मंडळांना पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी व त्यांच्यात निकोप स्पर्धा राहावी यासाठी हे पुरस्कार देण्यात येता.

गेल्या सहा वर्षांत गोवा राज्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा संपूर्ण तपशील दाखल केल्यानंतर या पुरस्कारासाठी गोव्याची निवड झाली असून मूलभूत सुविधांचा विकास, पर्यटन प्रकल्पांचा प्रारंभ, पर्यटन उत्पादने व सेवांचे लाँच, सुरक्षिततेसाठी हाती घेतलेले उपक्रम, स्वच्छता, धोरण, विपणन आणि प्रचार, कार्यक्रम या विभागांत केलेल्या कामगिरीचा त्यात समावेश आहे.


पुरस्कार स्वीकारताना माननीय पर्यटन मंत्री, गोवा सरकार, श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी आणि पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास विभागात गोव्याने पुरस्कार मिळवणे ही खरंच सन्मानाची बाब आहे. गेल्या वर्षभरात मी पर्यटन विकासाच्या विविध पैलूंवर बारकाईने देखरेख करत असून पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात बरेच उपक्रम राबवले जात असल्याचे नमूद करताना मला आंद होत आहे. याचा राज्याला जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मदत होत असून आकडेवारीबरोबरच मआम्ही पायाभूत सुविधा, सर्व प्रकारचे उपक्रम यांतही प्रगती केली आहे तसेच पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलली आहेत. हा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी मदत करणाऱ्या पर्यटन क्षेत्रातील प्रत्येक घटकधारकाचे मी आभार मानतो आणि नियोजन, धोरणे, प्रकल्पांची अंमलबजावणी करून आम्हाला प्रकाशझोतात आणणाऱ्या गोवा टुरिझमच्या अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. ही मेहनत, समर्पण आणि कार्यक्षम टीमच्या मदतीने आम्ही अशाचप्रकारे पुढे जात राहू आणि त्याची भविष्यातही अशा प्रकारे प्रतिष्ठित पुरस्कार मिळवण्यासाठी मदत होईल अशी मी आशा व प्रार्थना करतो मी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर आणि उर्जामंत्री व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष श्री. निलेश काब्राल यांनी गोवा टुरिझमला या टप्प्यावर नेण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain

  ‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain aka JJ Communi...