Tuesday, September 25, 2018

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे व स्टेफ्री ची भागीदारी

द प्रोजेक्ट खुशी ‘ फ्रीडम फॉर गर्ल्स ’ गरजू मुलींना ५० लाख सॅनिटरी पॅड्स देणार

मुंबई, २५ सप्टेंबर २०१८: मासिक पाळीच्या दरम्यान आरोग्यदायी व स्वच्छतेच्या सवयींच्या अभावी, पोंगडावस्थेतून वयात येणाऱ्या बहुतेकशा मुलींना पोषणाची कमतरता व आरोग्याच्या अन्य समस्यांना तोंड द्यावे लागते. भारतातील केवळ १८ टक्के महिलांना योग्य सॅनिटरी नॅपकिन मिळत असून, बाकीची बहुतांश लोकसंख्या पाळीच्या दरम्यान कापड वापरण्याची जुनी पद्धत आजही अवलंबते. लहान गावे व आदिवासी समाजातील चित्र विदारक असून, तेथे याबद्दल जागृती जवळजवळ झालेलीच नाही. तसेच, महिलांच्या यासंबंधीच्या सवयी विचारात घेता, त्यांना गंभीर स्वरूपाचा रोगसंसर्ग होतो किंवा काही वेळा तरुणींच्या जिवावर बेतते, त्यामुळे तेथे यासंबंधी शिक्षणाची आवश्यकता आहे.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शशीकुमार शर्मा यांनी सांगितले - “ मुंबई व पालघर महसूल जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महत्त्वाच्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या नात्याने, ९० हून अधिक रोटरी क्लब व ५२४० रोटरीअन्सच्या वतीने आदिवासी भागांतील गरजू मुलींना ५० लाख सॅनिटरी पॅड्स देणे हे द प्रोजेक्ट खुशी - फ्रीडम फॉर गर्ल्सचे उद्दिष्ट आहे. अल्प शिक्षित, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी व झोपडपट्टी भागातील युवतींसमोर आरोग्य व स्वच्छता हे गंभीर प्रश्न आहेत. मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅड वापरण्याऐवजी त्या कापडाचा वापर करतात. यामुळे त्यांना वेदना, रोगसंसर्ग व आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या निर्माण होतात. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे द्वारे, जेअँडजे च्या सहयोगाने दर्जेदार स्टेफ्री सॅनिटरी पॅड्स पुरवले गेले. गरजू मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार सॅनिटरी पॅड्स उपलब्ध केल्याबद्दल जॉन्सन अँड जॉन्सनला शुभेच्छा. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास तो भारतभर राबवण्याचा आमचा विचार आहे ”.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “भारतातील तरुणींना सबल आरोग्यदायी करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छतेची स्थिती आरोग्यदायी नसल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. तरुणींना अनेकदा रोगसंसर्ग होत असल्याने लहान वयातच त्यांच्या मनात चिंता व भीती निर्माण होते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास व मनोधैर्य खचते. शरीर व मन निरोगी असेल तर व्यक्ती अधक आत्मविश्वासपूर्ण व आनंदी असते. स्टेफ्री ने आमच्या उपक्रमांद्वारे नेहमीच मुलींना प्रोत्साहन दिले आहे. # ड्रीम्सऑफप्रोग्रेस ही आमची नवी कॅम्पेनही तरुणींना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी उत्तेजन देण्याचा एक प्रयत्न आहे. आजही, भारतातील बहुसंख्य महिला मासिक पाळीमध्ये कापडाचा वापर करतात. निरोगी जीवन जगायचे असेल तर यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.”

या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘स्टेफ्री’ हा जॉन्सन अँड जॉन्सनचा आघाडीचा सॅनिटरी नॅपकिन ब्रँड व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, डिस्ट्रिक्ट ३१४१ यांनी जव्हार, पालघर, डहाणू, शहापूर येथील आदिवासी व मुंबईतील झोपडपट्टी भागातील १३ ते १५ वयोगटातील (इयत्ता आठवी ते दहावी) किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करण्यासाठी फ्रीडम फॉर गर्ल्स – प्रोजेक्ट खुशी द्वारे सहयोग करणार. उच्च दर्जाची, कमी किमतीची सॅनिटरी पॅड्स विकत घेणे व ती वर्षभर या भागातील मुलींना देणे, जेणे करून त्यांना पाळीदरम्यान सुरक्षितता व स्वच्छता ठेवता येईल व पॅड वापरण्याचे फायदे घेता येतील, असे यामागील उद्दिष्ट आहे.

गरजू आदिवासी मुलींना ५० लाख सॅनिटरी पॅड्स देणे आणि पाळीदरम्यान आरोग्य व स्वच्छता यांची काळजी घेण्याचे महत्त्व त्यांना समजावून सांगणे, हे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम जून २०१९ पर्यंत राबवला जाईल व किशोरवयीन गटातील जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचवला जाईल. मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना मागे टाकत आहेत. परंतु तरुणींच्या आरोग्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. मुलींना शिक्षित करण्यासाठी व मूलभूतआरोग्य देण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, जेणे करून मुली अधिक आत्मविश्वासपूर्ण व स्वतंत्र बनतील.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...