Saturday, September 1, 2018


लोण्याचा लुटाया गोळा
आला रे हा गोविंदा आला
OR
आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं
लाँच
-              संदीप कुलकर्णीह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा
     श्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागतेप्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती.... याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेला सणम्हणजे दहीहंडी... थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळतेजल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोशवाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

        बेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णीह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनीचार चांद लावले आहेतसंदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

        करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्द केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबध्द केली आहेतर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात... संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहेहे अद्याप गुलदस्त्यातअसलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार आहे.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...