Wednesday, September 26, 2018

आयुष्याच्या नव्याने प्रेमात पाडणारा सचिन पिळगांवकरांचा
नवा सिनेमा लव्ह यू जिंदगी

  
             कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात लव्ह यू जिंदगी’...! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगीमधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं. या पोस्टरचं वैशिष्ट्य म्हणजे सचिन पिळगावकर एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांनी अनिरूद्ध दाते यांची भूमिका साकारलेली असून त्यांच्या आयुष्यातील गंमती जमती आपल्याला यातून अनुभवायला मिळणार आहे.   

             एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली 17 वर्ष झी टीव्हीझी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.

               वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...