Wednesday, September 12, 2018


उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा
                सोनी मराठी आयोजित कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
OR
गणेशोत्सवानिमित्त फुलली सोनी मराठीची हास्यजत्रा

आनंद, उत्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन... या गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच साजरा झाला सोनी मराठीच्याउत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा या पहिल्यावहिल्या दणदणीत कार्यक्रमात... प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नम्रता आवटेसंभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांच्या साथीनी फुलली हास्यजत्रा... या चौघांच्या जुगलबंदीनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात हास्यस्फोट झाला. या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीनी.... आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर वस्त्रहरण नाटकाचा सादर झालेला अंश प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिकाह्रदयात वाजे समथिंग याचे कलाकार निखील दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या ह्रदयात समथिंग नक्कीच वाजलं.
प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमात पुढेनाद करायचा नाय म्हणत संतोष जुवेकर यानी रंगमंचावर प्रवेश केला आणि प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. त्यानंतर संतोष जुवेकर सोबतइयर डाऊन या सोनी मराठीवरील मालिकेत असणारी प्रणाली घोगरे हिनी सुंदर नृत्याविष्कार केला आणि याच कार्यक्रमाची थेट झलक प्रेक्षकांसमोर सादर झाली.
हास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात मोरूची मावशी आली आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हास्यजत्रा भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण काढणं शक्यच नव्हतं. विजय चव्हाण.... एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा सच्च्या कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनीटांग टिंग टिंगाक करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.
अशा प्रकारे सांगता झालेल्या हास्यजत्रेचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांनी लुटला आणि जणू गणरायाच्या साक्षीने सोनी मराठीशी आपले नाते अजून अतूट केले .
  

सदर कार्यक्रम येत्या १९ आणि २० सप्टेंबर रोजी रात्रौ ९.०० वा सोनी मराठीवर प्रकक्षेपित होणार आहे.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...