Saturday, September 1, 2018


..बने तु..बने
मालिकेला प्रेक्षकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद!

आजच्या काळाशी सुसंगत आणि नवनवीन विषय हाताळण्यात येणाऱ्या सोनी मराठी चॅनेलवरील निरनिराळ्या आशयघन मालिकांमुळे सध्या सोनी मराठी सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. ग्रँड ओपनिंग आणि एका पेक्षा एक उत्तम मालिका यांमुळे फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनी मराठीच्या..बने तु..बने मालिकेला प्रेक्षकांचा विशेष कौल मिळाला आहे.

असं म्हंटल जातं की, ज्याप्रमाणे दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात वाद हे होतातच. आजवर अनेक चॅनेल्सनी सासू-सुनेच नातं विविध पैलूंद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.  परंतु सोनी मराठीने..बने तु..बने या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्नदृष्टीकोनवर आधारित तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातलं नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडलं आहे. करमणुकीसाठीचा हा विषय निवडून सोनी मराठी प्रेक्षकांना एक नवीन दृष्टिकोन देत, मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा रुजू करत आहे.

सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवरून आजकाल प्रेक्षक चॅनल यांमधील अंतर कमी होऊन प्रेक्षक आपली मते, आपली आवड निवड डायरेक्ट चॅनल, तसेच कलाकारांपर्यंत पोहोचविण्यास खूप प्राधान्य देत असल्याचे..बने तु..बनेमालिकेला सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते.

आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी, यांसारख्या मात्त्तबर कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि केदार आगास्कर, सखी दातार, पूर्वी शाह या बच्चे कंपनीने आणलेल्या धमाल मस्तीमुळे या मालिकेला मिळालेल्या प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादांमुळे..बनेतु..बने मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतं असल्याचे दिसून येते आहे.

सोनी मराठीच्याविणूया अतूट नातीह्या आपल्या मूळविचाराशी एकनिष्ठ राहत..बनेतु..बनेही मालिका दिग्दर्शन सचिन गोखले करत असूनही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. या मालिकेतील आणखीन गमती जमती आणि मनोरंजन अनुभवण्यासाठी..बने तु..बनेपाहत राहा, सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता. नवीन वाहिनी, सोनी मराठीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...