Wednesday, September 19, 2018

सणासुदीच्या निमित्ताने मागणी वाढल्याने एसओटीसी ट्रॅव्हलच्या बुकिंगमध्ये 20% वाढ
आगामी सणासुदीच्या निमित्ताने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, देशांतील व परदेशातील ठिकाणांसाठी असलेली एकंदर मागणी 15-20% वाढली असल्याचे निरीक्षण एसओटीसी ट्रॅव्हलने नोंदवले आहे. भारतातील सणासुदीचा हंगाम म्हणजे प्रामुख्याने कुटुंबाबरोबर व प्रियजनांबरोबर व्यतित करण्याचा कालावधी समजला जात असूनएसओटीसीने या बाबतीत महत्त्वाचा बदल पाहिला आहे. या कालावधीमध्ये झटपट हॉलिडेंचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिक सुट्यांचा वापर करण्याकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे.
शहरातल्या रोजच्या रटाळ धकाधकीतून सुटका होण्यासाठी इच्छुक असलेल्या पर्यटकांना सणासुदीचा हंगाम म्हणजे योग्य संधी वाटते, असे  एसओटीसीचे निरीक्षण आहे. सणासुदीच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा शहरांतील कुटुंबे, तरुण व डिंक यांच्याकडून मोठ्या संख्येने विचारणा होत आहे. देशातील ठिकाणांमध्ये केरळ, अंदमान, राजस्थान, गोवा व हिमाचल प्रदेश यांना सर्वाधिक मागणी आहे, तर ईशान्य भारत सर्वात लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. दुबई, हाँगकाँ, सिंगापूर व थायलंड ही लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ठिकाणे ठरली आहेत. इजिप्त, अझरबैजान, पूर्व युरोप (चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया व हंगेरी) ही ठिकाणेही लक्ष वेधत आहेत.
प्रवासाचा निर्णय घेण्याबद्दल पर्यटक अधिक साहसी होत आहेत व फारसे नियोजन व अभ्यास न करण्याकडे झुकत आहेत, असे एसओटीसीला आढळले आहे. पर्यटकांनी देशांतर्गत ठिकाणांसाठी झटपट बुकिंग केले आहे. साहसप्रेमी व तरुण यांना चाकोरीबाहेरच्या ठिकाणांची व नव्या अनुभवांची ओढ दिसून येते. त्यांचा कल पारंपरिक साइटसीइंग व गाइडेड टूर याऐवजी थरारक व प्रायोगिक प्रवासाकडे अधिक वाढला आहे; त्यांना रस्त्याने सफर करून, क्रुझद्वारे प्रवासाचे ठिकाण अनुभवायचे आहे, नवनव्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि स्थानिक गोष्टी पाहायच्या आहेत. महत्त्वाच्या महानगरांतील व उप-महानगरांतील ग्राहकांचा आकृष्ट करण्यासाठी, एसओटीसीने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सुपर हॉलिडे सेल या विशेष सवलतीचे योग्य प्रकारे नियोजन केले आहे. आगामी सणासुदीच्या काळात या महत्त्वाच्या विभागातील बुकिंगला चालना देण्यासाठी, कमीत कमी खर्चामध्ये अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या आकर्षक स्पॉट-ऑफर्स व विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त सवलती व ऑफर यांचा लाभ घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे एसओटीसीला वाटते.
एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत व एनआरआय मार्केट्स आणि ई-कॉमर्स विक्री प्रमुख डॅनिल डिसोझा यांनी सांगितले, सणासुदीचा हंगाम लवकरच सुरू होत असून, आधुनिक पर्यटकांना सुटीच्या दरम्यान भारतातील व परदेशातील नवी ठिकाणे पाहण्याची उत्सुकता असल्याचे एसओटीसी ट्रॅव्हलचे निरीक्षण आहे. विमानप्रवास व राहण्याची सुविधा याचे स्पर्धात्मक दर असे अनेक घटकही यास उत्तेजन देतात. आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाण्यासाठी 2-3 महिने आधीच बुकिंग करणाऱ्या लोकांचे प्रमाणही 35-40% वाढले असल्याचे दिसून येते”.

1 comment:

  1. Great post. Thanks for sharing this. For online shopping discount codes please try Ustraa Men Grooming Products for buying any product online. I tried it and get 40% Discount on my all products. Try this. Its amazing.

    ReplyDelete

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...