Thursday, February 20, 2020



सावनी रविंद्रचे 'शोन रे शोखी' ह्या बंगाली गाण्याव्दारे बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण

  
सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा सहा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांची मनं जिंकल्यावर आता ती बंगालीमध्ये आपलं पहिलं सिंगल’ घेऊन आली आहे.  शोन रे शोखी’ हे तिचं पहिलं बंगाली गाणं रिलीज झालंय.



बंगाली गाणं गाण्यासाठी सावनी बंगाली शिकली. ती म्हणते, गाणं गाताना शब्द उच्चारणही महत्वाचं असतं. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो ही यायला हवा. त्यामूळे गाण्यावर अर्थातच खूप मेहनत करावी लागली. हे गाणं आपली स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या मुलीचं मनोविश्व सांगणारं गाणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना मनोबल देणारं आणि सकारात्मक दृष्टीकोन देणारं गाणं आहे.


सावनीने गायलेल्या ह्या गाण्याचे गीत लिहिले आहेत, नाबरून भट्टाचार्य जी ह्या गीतकारने. तर  शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. गाण्याचे चित्रीकरण गोव्यात झालेलं आहे. गाण्याच्या मूडनूसार, गोव्यासारख्या शांत आणि रम्य ठिकाणाची निवड करण्यात आलीय. नवीन शहरात एकटीने राहणं, वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणं, आणि करीयर करणं हे कठीण जरूर असतं, पण अशक्य नसतं हेच ह्या व्हिडीयोतून दर्शवण्यात आलंय. डॉ. आशिष धांडे ह्यांनी ह्या गाण्याची निर्मिती केलीय. नवीन वर्षात सावनीचा नव्या सिनेसृष्टीतलं हे पहिलं पाऊल निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.  








*महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारला ‘दाह’ सिनेमा*

माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांचे कार्य महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या कार्यकाळात खूप मोठे निर्णय घेतले. लंडनमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर व इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय,  किंवा मुलींसाठी ५० नवीन वसतिगृह सुरू करणे, किंवा ओबिसीच्या किमी लेअरची मर्यादा वाढविणे व ओबिसी मुलींना एमपीएससी साठी आरक्षण अशा अनेक निर्णयाबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांच्यां कार्यकाळात दिव्यांग शाळा संहिता व जेष्ठ नागरिकांचे धोरण देखील आखले गेले.

             

राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजकुमार बडोले यांचे पुत्र अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून समाजसेवा, आपल्या शिक्षणाचा, बुध्दिचा वापर गावातील लोकांच्या भल्यासाठी कसा करता येईल हा एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. 

या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, "सामाजिक विषयावर आधारित हा सिनेमा आहे. गावागावांमध्ये अजूनही अशा काही अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, व्यवस्था आहेत ज्याचा परिणाम समाजावर होत असतो. जसे की उच्च जातीच्या व्यक्तीकडून खालच्या जातीच्या व्यक्तींसोबत होणार भेदभाव, एखादा आजार बरा करण्यासाठी पसरवली जाणारी अंधश्रद्धा, दारूबंदी सारख्या विषयाला होणारा विरोध आदी. या सर्व गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील एकूण व्यवस्था दाखवण्यात आली आहे.


समाजप्रबोधनासाठी सिनेमा हे एक प्रबळ साधन आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे की 'माणुसकीचा धागा हा रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट बांधला जातो'. 

मनोरंजनाच्या दृष्टीने सिनेमातील गाणी पण सुंदर झाली आहेत आणि सिनेमातील प्रत्येकाने खूप छान काम केलं आहे आणि एक चांगला मराठी सिनेमा तयार झाला आहे." 

 सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.


एबी आणि सीडी चा याराना १३ मार्चला रुपेरी पडद्यावर


याराना सिनेमातील ‘ सारा जमाना हसींनो का दिवाना ’ हे गाणं ऐकल्यावर  लगेच पाय थिरकायला लागतात आणि त्याचवेळी डोळ्यांसमोर उभा राहतो या गाण्यातील अमिताभ बच्चन यांचा गेट अपआता मराठी प्रेक्षकांना हा गेट अप नव्याने आठवेल कारण गेल्या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यावर अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘एबी आणि सीडी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होतेविशेष म्हणजे त्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले यांनी अमिताभजींच्या स्टाईलचा गेट अप केला होता आणि ‘चंदू मी आलो ’ असं वाक्य त्या पोस्टरसह अधोरेखित करण्यात आले होते.

 अक्षय विलास बर्दापूरकरप्लॅनेट मराठीगोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित ‘एबी आणि सीडीचे पहिले पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी प्रदर्शित करण्यात आले होते.

              
              


औरंगाबाद येथील आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या 'औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२०मध्ये मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडीया सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.  या नवीन पोस्टरमधून विक्रम गोखले आणि बिग बी यांच्या भूमिकेची आणखी एक नवीन झलक पाहायला तर मिळतेच पण त्याचसोबत सिनेमाची प्रदर्शित तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर घडणारी आनंदी घटना आणि त्याचे सेलिब्रेशन या  एका ओळीमुळे सिनेमाची उत्सुकता वाढतेनेमकी ती आनंदी घटना कोणती आणि सेलिब्रेशनविषयी तपशिलात लवकरच कळेल कारण  ‘एबी आणि सीडी  येत्या १३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या लक्षवेधी भूमिका तर आहेतच पण सिनेमाच्या शिर्षकामध्येही त्यांचे सुंदर कनेक्शन आहेआणि ते कनेक्शन असे की ‘एबी म्हणजे अमिताभ बच्चन आणि ‘सीडी म्हणजे चंद्रकांत देशपांडेदोन कलाकारांची ऑन स्क्रिन मैत्री  येत्या १३ मार्चला पाहायला मिळणार आहे.  या सिनेमात सुबोध भावेसायली संजीवअक्षय टंकसाळेशर्वरी लोहोकरेनीना कुळकर्णीलोकेश गुप्तेसीमा देशमुखसागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अमिताभजींना याच वर्षांनी मराठी सिनेमात पाहण्यासाठी आणि कौटुंबिक पण तितकीच मजेदारगोष्ट अनुभवण्यासाठी ‘एबी आणि सीडी तुम्हांला भेटायला येत आहेत १३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.


Wednesday, February 19, 2020



ग्लॅमरस अंदाजातल्या सईललितपर्णचा मीडियम स्पाइसी झळकणार 5 जूनला !

सई ताम्हणकरललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहेत्यांच्या मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या ह्या फोटोमूळे आता मीडियम स्पाइसी सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय. 

ह्या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूतविधि कासलीवाल निर्मितमोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ 5 जून 2020ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. 


ह्या चित्ताकर्षक फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सईललित आणि पर्ण ह्यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक ह्या फोटोतूनही प्रतीत होतेय. एखादा पदार्थ चविष्ट व्हायला जशी पदार्थांची योग्य प्रमाणात भट्टी जमणे गरजेचे आहेतशीच ह्या तीनही कलाकारांची भट्टी जमलेली तुम्हांला सिनेमा पाहताना जाणवेल. आपापल्या भूमिका स्वत:मध्ये मुरण्यासाठी सईललित आणि पर्णच्या मेहनतीला मोहितच्या दृष्टिकोणाचीही योग्य जोड मिळाली आहे. ह्या सगळ्यांची एकत्रित मेजवानी आता 5 जूनला प्रेक्षकांना मिळणार आहे.” 

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “सईललित आणि पर्णमूळे मीडियम स्पाइसी सिनेमाची लज्जत काही औरच झाली आहे. तिघांचेही व्यक्तिमत्वआवडी-निवडीकाम करण्याच्या पध्दती आणि उर्जा वेगवेगळ्या आहेत. पण एक रूचकर सिनेमा बनवायलाहाच वेगळेपणा सिनेमाचा समतोल राखण्यात आणि नाट्य खुलवण्यासाठी खूप परिणामकारकपणे उपयोगी पडलाय.

                  

सूत्रांच्या माहितीनूसारसध्या हा सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असल्याने चित्रपट संपूर्णपणे तयार व्हायला अजून काही काळ लागणार आहे. आणि त्यानंतर उन्हाळ्यांच्या सुट्ट्या संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर रिलॅक्स मूडमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा एन्जॉय करता यावाम्हणून सिनेमाच्या टिमने एकत्रितपणे रिलीज डेट 5 जून ठरवली आहे. 

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेमनातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकरपर्ण पेठेललित प्रभाकर ह्यांच्याशिवाय सागर देशमुखनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरइप्शिताह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.







BISLERI BOTTLES FOR CHANGE SPREADS ITS WINGS TO CHENNAI CREATING A POSITIVE IMPACT THROUGH NSS COLLABORATION WITH 48 COLLEGES


~ Spreading Message About The Much Needed Habit Change Towards Used Plastic Disposal- 'Train The Trainers' Workshop By 'Bisleri Bottles For Change' To Be Hosted With 48 Colleges In at Madras University in Chennai ~  
            

6th February 2020, Mumbai; 'Bisleri Bottles for Change'
 an initiative that works towards changing the habit of communities in valuing plastic as an effective resource has taken a step ahead and reached out to the colleges in Chennai through a collaboration with National Service Scheme (NSS) on 5th February, 2020 at Madras University. Dr. R Srinivasan Registrar University of Madras along with Dr. G Bhaskaran, Dr. Manivasagam HOD of Center for Southeast Asian Studies, Dr. B. Kothandaraman, Director Academic Staff College and Mr. Santosh Darne, Head OSR, Bisleri International Pvt Ltd were present for the workshop sharing their views on the initiative.




Bottles for Change has reached out to 48 colleges in Chennai through National Service Scheme (NSS) and organised an awareness session for the students. The workshop highlighted the importance of contributing towards a cleaner environment by sending it for recycling and not treating it as a waste. The educational session also focused on changing the mind-set of the young generation towards correct disposal of plastic so that it doesn’t end up in dump yards and ocean creating pollution. They were also trained about the Bottles for Change App through which they can contribute plastic right from their doorstep.







2 student representatives from each college attended the session and will be further helping in spreading the awareness about the initiative in their respective colleges, housing societies and other groups. The college with maximum plastic collection will be awarded with prizes and certificates by the initiative. Students from each college who will activate maximum housing society or individual will also be rewarded.  Through this activity, Bottles for Change aims to create awareness for a positive individual mind set(s) about plastic as a recyclable material. The idea is to ‘Be The Change, You Want To See’.


*INSTAGRAM*
Actress @saietamhankar begins shooting for the second schedule of Film Mimi with @kritisanon
@dreamers_pr

 #saietamhankar #kritisanon #secondschedule #actress #movie #mimi #dreamerspr


*TWITTER*
Actress @SaieTamhankar begins shooting for the second schedule of Film Mimi with @kritisanon  
 @DreamersPR

 #saietamhankar #kritisanon #secondschedule #actress #movie #mimi #dreamerspr


*FACEBOOK*



Actress Saie Tamhankar begins shooting for the second schedule of Film Mimi with Kriti sanon

 #saietamhankar #kritisanon #secondschedule #actress #movie #mimi #dreamerspr





*Karishma Shetty won "Iconic Celebrity Spiritual Coach" at Midday Awards . She was felicitated by Yogesh Jaiswal director Le Classique, Amyra Dastur & Editor Gujarati Midday Mayur Jani.





Starting with healing powers and spiritual knowledge at a tender age, Karishma has been a child prodigy and her expertise in Psychological and Parapsychological therapies, Tarot, Vastu, Numerology, Astrology, Angels, Fairies, Mediumship, Healing, Cleansing, Aura Reading, Candle Healing, Crystal Ball, Crystals, Wicca, Graphology, Methorpher Therapy, Colour Therapy, Tantra, Runes, Cartomancy amongst various others, started at very early age these are few of the things that she excels in and is spiritually blessed by the almighty.








 Karishma Shetty was conferred upon a Doctorate for Parapsychology, metaphysics and spiritual sciences to many eminent personalities ,celebrities,politicians & others .




'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...