Wednesday, June 11, 2025

Vishnu Manchu’s Kannappa Sets Trailer Launch Date for June 13

 Vishnu Manchu’s Kannappa Sets Trailer Launch Date for June 13

The much-anticipated mythological actioner Kannappa, headlined by Vishnu Manchu, is all set to drop its official trailer on June 13.

Mounted on a large scale, the film has generated considerable buzz for its ambitious storytelling and stunning visual canvas. Directed by Mukesh Kumar Singh, the film also includes Akshay Kumar, Kajal Aggarwal, Prabhas, Mohanlal, Arpit Ranka and other leading south actors. Kannappa draws inspiration from the revered devotee of Lord Shiva, bringing to screen a tale that blends devotion, destiny, and action.

While details about the trailer are still under wraps, fans can expect a glimpse into the film’s scale and world-building—something that has been in the making for years. The project also features an ensemble cast, with several surprise appearances expected.

With the trailer launch just around the corner, Kannappa is already shaping up to be one of the most talked-about releases of the year.



Tuesday, June 10, 2025

अवधूत गुप्तेंच्या ‘ आई’ अल्बममधील ‘तू नसशील तर’ भावस्पर्शी गाणे प्रदर्शित

 अवधूत गुप्तेंच्या ‘ आई’ अल्बममधील ‘तू नसशील तर’ भावस्पर्शी गाणे प्रदर्शित 

आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या भावस्पर्शी गीताचे शब्द लिहिले आहेत समीर सामंत यांनी व संगीत संयोजनाची जबाबदारी अनुराग गोडबोले यांनी सांभाळली आहे. 

'तू नसशील तर’ हे गाणे आईच्या अनुपस्थितीत निर्माण होणाऱ्या भावनिक पोकळीची हळवी जाणीव करून देणारे आहे. गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करणारे असून, अवधूत गुप्तेंचा आवाज या गाण्याला आणखी भावनात्मक उंचीवर घेऊन जातो. या गाण्याच्या निमित्ताने आईविषयीची कृतज्ञता, प्रेम आणि व्याकुळता अशा अनेक भावना व्यक्त होत आहेत.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “ ‘आई’ हा अल्बम माझ्या अत्यंत जवळचा आहेच मात्र ‘तू नसशील तर’ हे गाणे अधिकच जवळचे आहे. कारण, अलीकडेच मी माझ्या आईला गमावले असून त्या सर्व भावना या गाण्यातून मी व्यक्त केल्या आहेत. हे गाणे समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आले आहे याचं कारण म्हणजे मी जेव्हा समुद्रकिनारी जातो, आकाशाकडे बघतो तेव्हा मला असे वाटते की आई आहे आणि ती मला बघतेय. आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील रंग उडाले होते. मला कशातच रस नव्हता. त्यामुळे ही अशी भावना असल्याने हे गाणे ब्लॅक अँड व्हाईट शूट करण्यात आले आहे.”

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

 गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, 

वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 


या चित्रपटाचे निर्माते गौरी महाजनी, माधवी महाजनी आणि गश्मीर महाजनी असून लेखन व दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेला गश्मीर आता कॅमेऱ्यामागे जाऊन एक नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून साकारले जात आहे. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल मराठी सिनेसृष्टीतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असून या चित्रपटाचं नाव आणि कलाकार  जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


आपल्या या नवीन प्रवासाविषयी गश्मीर महाजनी म्हणतो, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकल्या, अनुभवल्या आणि आत खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. चित्रपट ही एक सामूहिक कला आहे, मात्र काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात. माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक (फर्स्ट लूक) समोर आला आहे. राज्याभिषेक दिनाच्या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी हा लूक प्रदर्शित करून या चित्रपटाच्या टीमने एकप्रकारे शिवराज्याभिषेकाला आधुनिक अभिवादनच केले आहे. सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राजस आणि तेजस्वी लूक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घोड्यावर विराजमान, डोक्यावर साजिरी मुगुट, डोळ्यांत विजेसारखी चमक आणि ताठ कणा दाखवणारी देहबोली या लूकमध्ये सिद्धार्थ अत्यंत आत्मविश्वासाने शिवरायांचा प्रभावी दरारा प्रेक्षकांसमोर उभा करत आहे.  ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभवी महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.

मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी ! 'आंबट शौकीन'मधील निखिल वैरागर - अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

                                             मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !                                                     'आंबट शौकीन'मधील निखिल वैरागर - अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र 

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत करत आहेत. आता अशाच नव्या आणि टॅलेंटेड जोडीचा प्रवेश मराठी सिनेमात होत आहे. ही जोडी म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे. या दोघांचा ‘आंबट शौकीन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी आपल्या नव्या दृष्टिकोनासह मराठी सिनेमात नवा श्वास घेऊन येत आहे.

या दोघांची केमिस्ट्री याआधी ‘गॅटमॅट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांनी पाहिलीच आहे. यावेळी ते सहकलाकार होते, तसेच निखिलने लेखकाची धुरा सांभाळली होती.  मात्र ‘आंबट शौकीन’मध्ये निखिल - अक्षय अभिनयासोबतच दिग्दर्शक- लेखक म्हणूनही समोर येणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांनी एक विनोदी, तरीही सामाजिक संदेश देणारी कथा रंगवली असून, प्रेक्षकांना मनोरंजनाचा आणि विचारांचा दुहेरी अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.

'आंबट शौकीन'च्या निर्मितीनंतर निखिल आणि अक्षय यांच्यावर आता संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. येत्या काळात ही जोडी काही नवे प्रोजेक्ट्स घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

निखिल वैरागर म्हणतो, ''आंबट शौकीन’ हा आमच्यासाठी केवळ चित्रपट नाही, तर आमचा आत्मविश्वास आणि आमचे अनुभव यांचं संकलन आहे. आम्हाला दोघांनाही वेगळं काहीतरी करायचं होतं आणि प्रेक्षकांसाठी ताज्या वाटा शोधायच्या होत्या. हा सिनेमा करताना आम्ही सतत विचार केला की, प्रेक्षक हसतील, त्याच वेळी अंतर्मुखही होतील आणि त्यातूनच 'आंबट शौकीन'ची निर्मिती झाली.'' 

तर अक्षय टंकसाळे म्हणतो, '' निखिल आणि मी याआधी एकत्र काम केल्याने त्याच्या कामाची पद्धत मला माहित आहे आणि त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू शकलो. आजच्या  तरुण पिढीला आणि कुटुंबवत्सल प्रेक्षकांना एका हलक्याफुलक्या माध्यमातून काहीतरी सांगता येईल का, हा प्रश्न आम्हाला पडला होता. आणि त्यातून ‘आंबट शौकीन’ जन्माला आला. आम्हाला आमच्या सिनेमात संपूर्ण टीमवर खूप विश्वास होता. आता प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं हेच आमचं खऱ्या अर्थाने यश असेल.”

हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Jyotica Tangri & Prince Narula Set Hearts Racing in "Heart Wali Baaji" A Power-Packed Romantic Anthem

 Jyotica Tangri & Prince Narula Set Hearts Racing in "Heart Wali Baaji" A Power-Packed Romantic Anthem


Watch the song here- https://youtu.be/blvZxCcteAM?si=S5i7h-aPxOSHO-Rp

The queen of feel-good anthems, Jyotica Tangri, is back—and this time, she’s bringing a fiery, beat-thumping love anthem that’s all heart and no brakes! Titled “Heart Wali Baaji”, the song is a bold, high-octane expression of playful love, featuring the charismatic Prince Narula on vocals and in the video. Produced by Igmor, and shot to visual perfection by Sumit Baruah, the track is nothing short of a millennial romance manifesto—with just the right amount of sass and swag.


Jyotica Tangri, the voice that gave chartbuster tracks like- Pallo Latke, Mungda, Ishq De Fanniyar, O Meri Laila comes another banger that combines her soulful pop texture with beats that make you want to fall in love mid-dance “‘Heart Wali Baaji’ is my love letter to Gen Z & millennial hearts—quirky, confident, and a little competitive when it comes to love! I’ve poured my soul into every note and lyric. It’s a playful challenge to everyone who's ever worn their heart like a badge of honour. Collaborating with Prince was like adding mirch to masala—undeniably hot"


Prince Narula adds “This track has energy. When Jyotica sent me the scratch, I was vibing in 10 seconds flat. ‘Heart Wali Baaji’ isn’t your typical love song, it’s flirtatious, cheeky, and kinda addictive. I had a blast lending my vocals and being part of the video. Expect attitude, love, and major couple-goal energy"


With visuals that flirt with fantasy and beats that are built for reels and road trips alike, "Heart Wali Baaji" is here to rule your playlist and your pulse. The music video adds a cinematic zing with stunning frames, soft grunge aesthetics, and just the right touch of dreamlike rebellion.


Whether you're in love, manifesting it, or just here for the drama—this baaji is one you’ll want to lose





माधव वझे यांच्या आठवणींचा स्मृतीगंध

 माधव वझे यांच्या आठवणींचा स्मृतीगंध

आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'श्याम' आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७  जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा  चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा ‘ऑल इज वेल’ हा  चित्रपट त्यांना श्रद्धांजली असणार आहे.  

माधव वझे यांच्यासारख्या अनुभवी, कलासंपन्न कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणे हा आम्हा सर्वांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रीकरणादरम्यान व्यतीत केलेले क्षण आणि त्यांच्याकडून मिळालेले  मोलाचे मार्गदर्शन  कधीही विसरता न येण्याजोगे आहे असं  सांगताना, ‘ऑल इज वेल’ चित्रपटाची टीम त्यांच्या आठवणीत भावुक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत एक खास फोटो चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझर मध्येही ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांची झलक पहायला मिळतेय.

‘ऑल इज वेल’ चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत.संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे.नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर गीतकार मंदार चोळकर आहेत.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...