Thursday, June 28, 2018

गोवा टुरिझमतर्फे म्हादेई नदीत राफ्टिंग करण्याचा चित्तथरारक अनुभव २८ जूनपासून

पणजी२७ जून २०१८ – पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि खळाळत्या म्हादेई नदीत किनाऱ्यावर वसलेल्या वन्यजीवन अभयारण्याच्या साक्षीने लाटांवर स्वार होण्यासाठी हीसर्वात चांगली वेळ आहेहा अनुभव देण्यासाठी जीटीडीसी २८ जूनपासून व्हाइट वॉटर राफ्टिंगती सुरुवात करत असून हा उपक्रम सप्टेंबरपर्यंत सुरू राहीलदर दिवशी दोन राफ्टिंगसहलींचे आयोजन करण्यात येणार असून पहिली ट्रिप सकाळी .३० वाजता आणि दुसरी दुपारी .३० वाजता केली जाणार आहेप्रत्येक सहलीमध्ये . ते . तासांत १०किलोमीटरचे अंतर पार केले जाणार असून त्यादरम्यान पर्यटकांना लाटांच्या वेगाबरोबर पुढे जात निसर्गरम्य लँडस्केप्सचा अनुभव घेता येणार आहे.

व्हाइट वॉटर राफ्टिंगच्या चित्तथरारक अनुभवासाठी तुम्हाला वाल्पोई येथील  अर्थन पॉट रेस्टॉरंटमध्ये एकत्र येता येईल  तिथून २५ मिनिटे प्रवास आणि १० मिनिटे चालतगेल्यावर म्हादेई नदीच्या खोऱ्यात वसलेल्या राफ्टिंगच्या ठिकाणी पोहोचता येईलतेथे तुम्हाला उपकरण बसवून दिले जाईल आणि तुमचा प्रवास सुरक्षित  अविस्मरणीयहोण्यासाठी रिव्हर गाइड्सद्वारे सुरक्षेसंदर्भातील सुचना दिल्या जातीलतुम्ही पहिल्यांदाच असा प्रवास करत असालतरी काळजी करण्याचे कारण नाही कारण आमचा उच्चप्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी वर्ग तुमच्या सुरक्षेची काळजी घेईल.  

यावर्षी व्हाइट वॉटर राफ्टिंग अनुभव वेगळा असार आहेगोवा टुरिझमने देशातील आघाडीच्या साहस क्रीडा व्हिडिओ कंपनीशी करार केला असून त्यामुळे तुमचा राफ्टिंग अनुभववैयक्तिक व्हिडिओद्वारे कैद केला जाणार आहेहा व्हिडिओ त्याच दिवशी व्हॉट्स अप किंवा गुगल ड्राइव्हद्वारे शेअर केला जाईलत्यासोबत आठवण म्हणून फ्रेम केलेला फोटोहीदिला जाईलराफ्टिंग ठिकाणापर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दिवसातून दोनदा पणजी ते उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत २०० रुपयांत बस सेवा सुरू करण्याचा विचारआहे.

गोव्यातील रिव्हर राफ्टिंग ट्रेंडविषयी श्रीनिलेश काब्रालअध्यक्षगोवा पर्यटन विकास महामंडळ म्हणालेविश्रांतीसाठी गोवा हे कायमच सर्वोत्तम भारतीय ठिकाणांपैकी एकमानले जाते  आता गोव्यात वॉटर स्पोर्ट्स उपक्रमही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेतउपलब्ध असलेल्या भरपूर उपक्रमांपैकी म्हादेई नदीतील भोवरे रिव्हर राफ्टिंगउपक्रमाद्वारे पार करण्याला पर्यटकांची चांगली पसंती मिळत आहेम्हणूनच या वर्षी आम्ही आघाडीच्या साहस क्रीडा व्हिडिओ कंपनीशी करार करून त्याद्वारे साहसप्रेमींना म्हादेईनदीत राफ्टिंग करतानाचे त्यांचे व्हिडिओज देण्याचे आठवण म्हणून देण्याचे ठरवले आहेभविष्यातही आम्ही वेगवेगळे करार करणार आहोतजे प्रवाशांचा अनुभव समृद्धकरण्यासाठी आम्हाला मदत करतील.

ही सहल प्रथमच राफ्टिंग करणाऱ्यांसाठी आणि दहा वर्ष वयाच्या पुढच्या मुलांसाठी आदर्श आहेसुरक्षित फुटवेअर आणि योग्य कपडे बंधनकारक आहेत.
या सहलीचा खर्च प्रती व्यक्ती १८९० रुपये प्रती व्यक्ती असून त्यात पाच टक्के जीएसटीचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...