Wednesday, June 20, 2018

अवघ्या ४५० ग्रॅम वजनाच्या स्वराला मिळाले जीवनदान
महाराष्ट्रामध्ये प्रसूतीदरम्यान अर्भकांचा मृत्यूदर हा १००० मध्ये २४ एवढा आहे

मुंबई, २० जून २०१८:- श्रेया संतोष शिंदे या महिलेने भारतामधील सर्वात कमी वजनाच्या मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळाला जन्म दिला. २६ महिन्यांच्या गरोदर असलेल्या या महिलेला बाळंतपणातील अडचणींमुळे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला बाळंतपणामुळे येणारा उच्च रक्तदाब जडला होता. या महिलेची प्रसूती योग्य वेळेत झाली नसती तर उच्चदाब नियंत्रित करण्यासाठी तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले असते.

अशा परिस्थितीमध्ये गर्भाशयामध्ये असलेल्या बाळाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. ‘अल्ट्रासोनोग्राफी’ द्वारे ही महिला २६ आठवड्यांची गरोदर असल्याचे निदान झाले होते. मात्र प्रत्यक्षात गर्भाशयातील बाळाची वाढ २४ आठवड्यां एवढीच झाली होती. त्यामुळे २६व्या आठवड्यात या महिलेला प्रसूतितज्ज्ञ डॉ. मेघा अनाजे यांच्या सल्ल्यानुसार कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेच्या प्रसूतीवेळी ३ निओनास्टोलॉजिस्ट उपस्थित होते. या महिलेने जन्म दिलेल्या स्वरा या मुलीचे जन्मत: वजन ४५५ ग्रॅम एवढे होते.

या महिलेच्या प्रसूतीनंतर बाळाला चार महिने ‘एनआयसीयू’ मध्ये (नीओनातल इंटेन्सिव्ह केअर युनिट) ठेवण्यात आले. या बाळाचा श्वासोच्छ्वास एका नलिकेद्वारे सुरू होता. तसेच नलिकेद्वारेच या बाळाला द्रवअन्नपदार्थ पुरविण्यात येत होते. मुदतपूर्व प्रसूती होऊनही या बाळाची प्रकृती आता ठीक असून तिचे वजन २.५ किलोएवढे वाढले आहे.

या बाळाचे वडील श्री.संतोष काशीराम शिंदे म्हणाले, “हे आमचे पहिलेच मूल असल्यामुळे आम्हाला काळजी वाटत असली तरी आम्ही एक संधी घेतली. प्रसूतीपूर्वी आम्ही बोरिवली मधील एका रुग्णालयात गेलो होतो. मात्र अशा प्रकारच्या प्रसूतीसाठी आपले रुग्णालय सुसज्ज नसल्याची माहिती या रुग्णालयातर्फे देण्यात आली. त्यांनीच आम्हाला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. प्रसूतीनंतर आमच्या बाळाचे वजन ५०० ग्रॅमपेक्षाही कमी होते. प्रसिद्ध निओनास्टोलॉजिस्ट डॉ. विनय जोशी यांनी प्रसूतीपूर्वीच आम्हाला संभाव्य लागण आणि शस्त्रक्रियेमधील गुंतागुंत सांगून आमची मानसिक तयारी केली होती. मात्र ११० दिवसांनंतर आमच्या सुंदर स्वराची प्रकृती या रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले उपचार आणि काळजीमुळे ठणठणीत आहे. आम्हाला स्वराला घरी घेऊन जाताना विशेष आनंद होत आहे.”

कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायण म्हणाले, “ ‘एनआयसीयू’ विभागातर्फे नवजात शिशूंचे प्राण वाचविणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. आमच्या येथील व्यवस्थापन असे आहे की येथील डॉक्टरमंडळी तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे रुग्णाला नवीन आयुष्य प्रदान करतात. प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी आमचे डॉक्टर पथक सदैव सज्ज असते. त्यामुळेच आई आणि बाळ सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.”

कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील प्रख्यात निओनास्टोलॉजिस्ट डॉ. प्रीथा जोशी म्हणाल्या, “मी आणि माझ्या टीमसाठी या बाळाची देखरेख करणे हे खूप आव्हानात्मक काम होते. मात्र बाळाची आई आणि बाळाची प्रकृती आता उत्तम असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या रुग्णालयामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. प्रसूतिदरम्यान आई आणि बाळाच्या जीवाला प्राधान्य दिले जाते. आमच्या रुग्णालयातील नीओनातल अतिदक्षता विभागामध्ये ५ वर्षांच्या बाळापासून ते १८ वर्षे होईपर्यंत वारंवार तपासण्या केल्या जातात.”

या प्रसूतीवेळी उपस्थित असणारे डॉ. संजीव वेंगलथ म्हणाले, “प्रसूती व्यवस्थापनाद्वारे पहिल्या काही मिनिटांमध्येच पुढील काळातील घडामोडींबाबत निर्णय घेतले जातात. मुदतपूर्व प्रसूतीदरम्यान महिलेला मध्यवर्ती ठेवून रुग्ण महिला तसेच तिच्या बाळावर उपचार केले जातात. या प्रकरणात नेमकी हीच गोष्ट केल्यामुळे बाळाची योग्य प्रकारे वाढ झाली.”

नऊ महिन्यांनंतर जन्म दिलेल्या अर्भकांचे वजन सर्वसाधारणपणे २.५ ते ३ किलो दरम्यान असते. मुदतपूर्व जन्म झालेल्या आणि १ किलो वजन असलेल्या अर्भकांचा जीव वाचण्याचे प्रमाण साधारणपणे ७० ते ८० टक्के एवढे असते. मात्र, चांगल्या सेवासुविधा असलेल्या ठिकाणी या अर्भकांवर उपचार झाल्यास हे प्रमाण ९० ते ९५ टक्के एवढे वाढते. दर तीन महिन्यांनी बाळाच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. हे बाळ पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याच्या वाढीच्या विकसनावर शिक्कामोर्तब केले जाते. ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करणाऱ्या महिलांमध्ये प्रसूतिपूर्व अर्भकांचा जन्म होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्रामध्ये प्रसूतीदरम्यान अर्भकांचा मृत्यूदर हा १००० मध्ये २४ एवढा आहे. त्यापैकी २-३ अर्भकांचा जन्म हा प्रसूतीपूर्व झालेला असतो. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या समस्यांवर मात करण्यासाठी पूर्णवेळ सज्ज असलेले डॉक्टर पथक तयार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...