Saturday, August 4, 2018






&TVचे कलाकार सांगताहेत त्यांचे फ्रेंडशिप डेचे प्लॅन्स
मित्रमैत्रिणींसोबतच्या आठवणींना उजाळा, ही मैत्री अशीच टिकवून ठेवू असं म्हणत दिलेली वचनं या सगळ्या आठवणी जागवण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मित्र म्हणजे तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ओळखणारा, तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे समजून घेणारा आणि तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारणारा माणूस. यंदाच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने &TVचे कलाकार त्यांच्यासाठी मौल्यवान असलेल्या मित्रांबद्दल आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मित्रांना सरप्राइज देण्यासाठी ते कसा वेळ काढणार आहेत, हे सांगताहेत.
प्रकृती मिश्रा ऊर्फ बिट्टी बिझनेसवालीमधील बिट्टी
आयुष्यात काही फार काळजी घेणारे मित्र भेटलेत हे माझं नशीबच आहे. लिप्सा ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिने माझ्यासाठी आजवर बरीच तडजोड केली आहे. चांगली मैत्री आयुष्यातला आनंद द्विगुणित करते आणि वाईट गोष्टी कमी करते, असा माझा विश्वास आहे. मी बऱ्याचदा चित्रीकरणात व्यस्त असते. त्यामुळे तिला भेटायला अगदी कमी वेळ मिळतो. ही परिस्थिती पाहता तिने नोकरी सोडली आणि ती मुंबईत आली. माझ्यासाठी फ्रेंडशिप डे म्हणजे आयुष्यात चांगल्या मित्रांचं असणं साजरं करणं. तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि आठवणींच्या, विशेषत: बालपणीच्या आठवणीत रमण्यासाठी यंदा मी अर्धा दिवस सुट्टी घेणार आहे.
राहुल शर्मा ऊर्फ मिटेगी लक्ष्मणरेखाचा विशेष
माझा जवळचा मित्र म्हणजे थेट शाळेतला, राजस्थानमधील माझ्या दौसा गावातला. मी त्याला गेली १५ वर्षं ओळखतोय. आम्ही फोनवरून नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतो आणि व्यस्त वेळापत्रकातूनही भेटण्यासाठी वेळ काढतो. फेंडशीप डे म्हणजे मैत्रीचा गाभा साजरा करणं. म्हणूनच मी त्याला एक व्हिडिओ बनवून पाठवणार आहे. ज्यात मी त्याला सांगणार आहे की माझ्या स्ट्रगलच्या काळात तो कितीतरी वेळा माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे. आणखी एक मित्र आहे संकल्प शर्मा. तो मुंबईत राहतो. मी त्यालाही सरप्राइज देणार आहे. मी चित्रीकरणात जितका व्यस्त असतो त्याही पेक्षा अधिक तो व्यस्त असतो. त्यामुळे, नेहमीच्या दिनक्रमात बदल म्हणून मी कदाचित त्याला डिनरला घेऊन जाईन आणि त्याच्या प्रचंड व्यस्त कामाच्या आयुष्यातून त्याला थोडा ब्रेक देईन.
अग्निफेराचा अनुराग ऊर्फ अंकित गेरा
माझे जवळचे मित्र आणि ज्यांच्यासोबत माझं अगदी घट्ट नातं आहे ते सगळे माझे शाळेतले मित्र आहेत. मी कोणा एकाचं नाव नाही घेणार कारण ते सगळेच माझ्यासाठी खास आहेत. त्यातले अनेक जण दुबईला राहतात आणि कामात फारच व्यस्त असतात. पण संधी मिळाली तर 'चड्डी बडीज' सोबत बसून एखादं दोन ड्रिंक घ्यायला मला आवडेल. या फ्रेंडशिप डेनिमित्त माझ्या अतिशय जीवलग अशा सम्राट या मित्राला मला सरप्राइज द्यायचं आहे. माझ्या बऱ्या-वाईट सर्व प्रसंगांत तो माझ्यासोबत होता. तो एक अतिशय प्रतिभावान संगीतकार आहे. मी त्याला गिटार घेऊन देणार आहे.
बिट्टी बिझनेसवालीमधील माही ऊर्फ अभिषेक बजाज
रश्मी देसाई या क्षेत्रातील जवळची मैत्रीण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक छान मैत्रीण असावी. आम्ही खूप छान वेळ एकमेकांसोबत घालवलाय आणि अनेक आठवणीही आहेत. पण, बऱ्याच काळात आम्ही भेटलोच नाही. तिला भेटावं आणि छान धमाल करावी असं वाटतं. आणखी एक मित्र म्हणजे सुमीत समनाई. आम्ही बऱ्याच काळापासून मित्र आहोत. तो अगदी भावासारखा आहे. मी त्याला चिडवतो, त्याची गंमत करतो. त्याला गर्लफ्रेंड नाहीए. मी विचार करतोय त्याच्यासाठी फ्रेंडशिप डेचं सरप्राइज म्हणून ब्लाइंड डेट द्यावी.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...