माझी पत्नी
नेहा हिला जरा गंमत म्हणून घाबरवायला मला आवडेल : नमन शॉ
लाल इश्क ही भारतीय प्रेक्षकांच्या आवडत्या दोन
प्रकारांना एकत्र आणणारी नवीन संकल्पना आहे. तुम्हाला
त्याबद्दल काय वाटते?
ही संकल्पना खूप वेगळी आहे. इतक्या सुंदर कथा सांगण्यासाठी अनेक कलात्मक मने एकत्र येताना पाहणे ही अत्यंत
आनंदाची गोष्ट आहे. प्रेम आणि नाट्यमय घटना आणि सुपरनॅचरल गोष्टी
हे सगळे एकत्र आणणारे खूप कमी शो मी पाहिले आहेत. या दोन्ही प्रकारांचा
प्रेक्षकवर्ग वेगवेगळा असला तरी लाल इश्कमधून या दोन्ही प्रकारांना एकत्र आणले जाते
आणि या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत ते एकाच वेळी पोहोचू शकतात.
तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगू शकाल का?
मी ध्रुव या एका साध्या आणि मध्यमवर्गीय विवाहित
माणसाच्या भूमिकेत आहे. आपल्या आयुष्यात आनंदात असलेला तो वडील होण्याच्या प्रतीक्षेत
आहे. आपल्या मुलाला एक चांगले आयुष्य देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या
संरक्षणासाठी तो काहीही करायला तयार आहे.
तुमच्या आवडत्या सुपरनॅचरल वेब मालिका कोणत्या? आणि का?
‘दि डार्क’ ही माझी
आवडती वेब मालिका आहे कारण ती भयकथा किंवा फक्त सुपरनॅचरल कथा नाही तर त्यातून नात्यांचे
महत्त्वही स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमचा सुपरनॅचरल गोष्टींवर विश्वास आहे का? तुम्ही कधी अशा गोष्टींचा अनुभव घेतला आहे का?
कोलकातामध्ये मोठा होत असताना सुपरनॅचरल गोष्टी अस्तित्वात असतात
यावर माझा विश्वास बसू लागला आहे. मी स्वतः कधी सुपरनॅचरल गोष्टींचा अनुभव
घेतलेला नाही परंतु माझ्या आजूबाजूंच्या लोकांचे अनुभव ऐकले आहेत आणि मला अशा गोष्टी
कायमच भीतीदायक वाटत राहिल्या आहेत.
तुम्ही कधी कोणाची अशी भीतीदायक गंमत केली आहे का? नसेल तर, तुम्हाला
कोणत्या व्यक्तीची अशी मस्करी करायला आवडेल?
मी स्वतः हॉरर चित्रपट पाहिल्यावर खूप घाबरत असल्यामुळे
अशा भीतीदायक गंमती करण्यापासून मी लांब असतो. परंतु, मला करायचीच असेल तर मी माझी पत्नी नेहा हिच्यासोबत करेन कारण तिची प्रतिक्रिया
बघण्यासारखी असेल! किंवा कदाचित
ती मला बाहेर फेकून देईल! (हसतो)
एखादी अशी प्रेमकथा जिला तुम्हाला सुपरनॅचरल ट्विस्ट
द्यायला आवडेल? आणि त्या कथेत तुम्हाला कोणाबरोबर काम करायला आवडेल?
मला आपल्याकडच्या प्रेमकथा खूप आवडतात. त्यामुळे मला त्यांच्या कथा बिघडवायला आवडणार नाही. मी
अलीकडेच धडक पाहिला, त्यामुळे
इशान खट्टरच्या व्यक्तिरेखेने आशुतोष राणा आणि कंपनीचा भूत होऊन पाठलाग केलेला पाहायला
आवडेल.
मिलेनियलमधील तुमचा आवडता अभिनेता?
मला अलीकडेच धडकची जोडी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर
आवडू लागले आहेत.
अभिनयाशिवाय तुम्हाला आवडणाऱ्या आणखी तीन गोष्टी कोणत्या?
मला लोकांना हसवायला आवडते आणि मला अनेकदा लोक सांगतात
की मी त्यांना हसवू शकतो. त्यामुळे मला कॉमेडी शो किंवा विनोदी भूमिका करायला आवडेल.
शूटिंग करत नसताना विविध ठिकाणी फिरायला आणि नवनवीन जागा बघायला मला
आवडते.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST