सई ताम्हणकरच्या वाढदिवशी फुलले 100 गरजू मुलांच्या चेह-यावर हास्य
अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. हे तिच्या सामाजिक जीवनातल्या वावरावरून नेहमीच दिसून आलंय. सईचा समाजकार्यांमध्ये सक्रिय सहभाग असतो. आणि तिचा सईहोलिक्स हा फॅनक्लबही सईचे हेच विचार पूढे घेऊन जात आहे.
सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त दरर्षी सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता. तर यंदा त्यांनी पुण्यातल्या सूमारे 100 गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पूण्यात फिरत असलेल्या ‘सई बर्थडे ट्रक’ने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला.
सईहोलिक्स ह्या उपक्रमाविषयीचा विचार मांडताना म्हणतात, “सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते. आणि सईचा हा विचार पूढे नेत आम्ही फॅनक्लबनेही मग तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच यंदा गरजू मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही खाऊच आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचे वाटप केले.”
अभिनेत्री सई ताम्हणकर ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली, “माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मीही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन.”
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST