Friday, June 7, 2019



जे. डी. पॉवरच्या मिडसाईज कार सेगमेंट आणि युटिलिटी वेहिकल सेगमेंटमध्ये ग्राहक समाधानात ब्रिजस्टोनची बाजी

अभ्यासानुसार उल्लेखलेल्या वर्गवारींमध्ये अनुक्रमे 861 आणि 836 लक्षणीय गुण

मुंबई, 3 जून 2019 – ग्लोबल कन्झ्युमर इन्साईट आणि डेटा अॅनलिटीक्सचा बादशाह जे. डी. पॉवर 2019 च्या इंडिया ओरिजनल इक्विपमेंट टायर कन्झ्युमर सॅटीसफक्शन इंडेक्स (टीसीएसआय) अभ्यासानुसार ब्रिजस्टोन इंडियाला ग्राहक समाधानात सर्वोच्च क्रमवारी मिळाली आहे. या अभ्यासानुसार ब्रिजस्टोन इंडिया मिडसाईज कार सेगमेंट आणि युटिलिटी वेहिकल सेगमेंटमध्ये अनुक्रमे 861 आणि 836 लक्षणीय गुण मिळवून अग्रेसर ठरली आहे.

“आम्हाला मिळालेल्या सन्मानामुळे आनंद झाला आहे. यामुळे आमच्या उत्पादनाचा दर्जा राखण्यात आमचा आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे. ब्रिजस्टोनचा गुणवत्ता मापदंड आमच्यासाठी मुख्य मुद्दा असून त्यामुळे जगभर उद्योगक्षेत्रात आम्ही अग्रगण्य आहोत. ही वचनबद्धता आम्हाला भारतीय बाजारपेठेतील यशाची गुरुकिल्ली ठरली. ही क्रमवारी आणि ग्राहकांचा विश्वास भविष्यातही निश्चितपणे राखू याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो" असे ब्रिजस्टोन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पराग सातपुते म्हणाले. 

जे. डी. पॉवर 2019 इंडिया ओरिजनल इक्विपमेंट टायर कन्झ्युमर कस्टमर सॅटीसफॅक्शन अभ्यासाचे लक्ष्य हे टायर डिझाईन, हवामान, रस्त्याची अवस्था तसेच ड्रायव्हरच्या सवयी यावर वाहनाच्या चाकाचे आयुष्यमान यावर होता. त्यामुळे आपल्या निरिक्षणात वास्तविक स्थिती दर्शविण्यात आली. 

चीफ मार्केटींग ऑफिसर श्री. दीपक गुलाटी म्हणाले की, "ब्रिजस्टोनमध्ये आमच्यापैकी प्रत्येकासाठी ही क्रमवारी निश्चितपणे सन्मानाची बाब ठरली आहे. आमच्या ओईएम पार्टनर्सनी आमच्या उत्पादनावर जो विश्वास दाखवला हे त्याचेच प्रतिबिंब आहे. आमची सातत्यपूर्ण भागीदारी आणि ग्राहकांसोबतचा संपर्क यामुळे त्यांच्या गरजा आणि आवश्यकता समजून घेण्यासाठी मदत झाली. आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम तेच देतो आणि त्यांना जागतिक दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत." 

हे अभ्यासाचे 19 वे वर्ष आहे, यामध्ये चार घटकांत (क्रमवार महत्त्व): ((वेअर)प्रकार, (राईड) सफर/प्रवास, (ट्रॅक्शन/ हँडलिंग) भार/हाताळणी आणि (अपिरिअन्स) दिसणे) पहिल्या 12 ते 36 महिन्यांत मूळ साहित्य टायरच्या मालकांचे समाधान नमूद करण्यात आले. 2019 च्या अभ्यासातील इतर महत्त्वाची निरीक्षणे म्हणजे वापर केल्याने टायर समाधान घटणे; वाढत्या वापराने समस्यांमध्ये वाढ आणि समाधानामुळे निष्ठा व समर्थनाला चालना मिळते. 

जे.डी. पॉवरविषयी
जे. डी. पॉवर हा ग्राहक अंदाज, सल्लागार सेवा आणि डेटा तसेच विश्लेषणातील  जागतिक मातब्बर मानला जातो. या क्षमतांमुळे जे. डी. पॉवर आपल्या ग्राहकांना ग्राहक समाधान, वृद्धी आणि नफा याविषयी मदत करतो. 1968 मध्ये स्थापण्यात आलेल्या जे. डी. पॉवरची कार्यालये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया पॅसिफिक आणि युरोप येथे आहेत.

ब्रिजस्टोन इंडियाबद्दल:
ब्रिजस्टोन इंडिया प्रा लिच्या कामकाजाला 1996 मध्ये सुरुवात झाली. मार्च 1998 मध्ये मध्यप्रदेशातील खेडा येथे निर्मिती सुविधा स्थापण्यात आली. भारताच्या रस्त्यांकरिता ब्रिजस्टोन टायर्सची निर्मिती करून भारताला धावते ठेवण्याचे ध्येय ब्रिजस्टोनने गाठले. 2013 मध्ये कंपनीने पुण्यातील चाकण येथे आणखी एक सुविधा केंद्र उभारून आपला विस्तार वाढवला. 20 वर्षांहून अधिक कालावधीच्या आपल्या छोट्या वाटचालीत ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही ओईएम आणि रिप्लेसमेंट मार्केट अशा दोन्हीतील अग्रगण्य टायर कंपन्यांपैकी एक मानली जाते.

ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनविषयी:
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे मुख्यालय टोकयो येथे असून आज ती जगातील सर्वात मोठी टायर आणि रबर कंपनी मानली जाते. या कंपनीने तयार केलेले टायर विविध कामांसाठी वापरण्यात येतात. त्याशिवाय अनेक तऱ्हेच्या इतर उत्पादन श्रेणींची निर्मिती कंपनी करते, ज्यामध्ये औद्योगिक रबर आणि रासायनिक उत्पादने व स्पोर्टींग वस्तूंचा समावेश आहे. त्यांची उत्पादने जगभरातील 150 हून अधिक राष्ट्रांत व प्रदेशांत  विकली जातात.

For Media Queries, contact:
अधिक माहितीकरिता, कृपया संपर्क साधा:
प्रशांत : मोबाईल - 9833166702 prashant@integral-india.in
Monika| 8976490166|monika@integral-india.in
Shruti Vaidya| 7400254440 |shruti-vaidya@bridgestone.co.in

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...