Friday, June 14, 2019


ओ-लाईन-ओतर्फे भारतात प्रथमच तंत्रज्ञान आणि अनुभवाचे दुर्लभ सादरीकरण
मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि ठाणे येथे 75हून अधिक दालने खुली







मुंबई 2019 – मोबाईल हॅण्डसेट्स आणि संबंधित उत्पादनांचा वापर करणाऱ्या प्रत्येकाच्या दारात आता ऑफलाईन सेवा प्रदान करण्यासाठी अनोखा ऑनलाईन शॉपिंग अनुभव ओ-लाईन-ओ या ब्रॅण्डने आणला आहे. अनुभवी रिटेल व्यावसायिकांच्या समुहाने सुरू केलेल्या ओ-लाईन-ओ या ब्रॅण्डने 75 हून अधिक दालनांत आपल्या अनोख्या सेवा पुरवण्याचे ध्येय बाळगले असून सध्या ही दालने मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि ठाणे या ठिकाणी उभारण्यात आली आहेत, ज्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. ऑफलाईन रिटेल सेवांसोबत ऑनलाईन मोबाईल शॉपिंगचा आनंद ग्राहकांना देण्यासाठी ओ-लाईन-ओचा जन्म झाला. तंत्रज्ञान आणि अनुभव या दोहोंचे प्रतिनिधित्व हे व्यासपीठ करते. 75 हून अधिक रिटेल दालनांसोबतच, वेबसाईटच्या स्वरुपात या व्यासपिठाने क्लाऊड स्टोअरही सुरू केले आहे.
संपूर्ण ऑनलाईन अनुभवासह लोकांच्या खरेदीच्या सवयीही बदलल्या आहेत, जो गेम चेंजर ठरला आहे. आरामदायीपणा आणि अनुभव या दोन गोष्टींवर शॉपिंग अवलंबून असते. केवळ एका क्लिकवर ऑनलाईन शॉपिंगमुळे आपण शेकडो उत्पादनांचा आस्वाद घेऊ शकत असल्यामुळे, ऑनलाईन खरेदीदार ऑनलाईन शॉपिंगलाच अधिक प्राधान्य देतात.
हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी ओ-लाईन-ओतर्फे ग्राहकांना पुढील सेवांचा संच देण्यात येत आहे –
·         शेकडो उत्पादनांची उपलब्धता केवळ एका क्लिकवर
·         यूजर्स आणि ग्राहकांसाठी ऑफलाईन यूजर इंटरफेस
·         किंमतीला न्याय देणारी उत्पादने
ग्राहकांसाठी रिटेल दालनांचा व्यक्तीगत अनुभवच केवळ ओ-लाईन-ओ आणत नाही तर, ही उत्पादने ग्राहकांच्या दारात आणण्याचे कामही हे व्यासपीठ करते. दोन्ही व्यासपिठांमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा उद्देश असतो.
ओ-लाईन-ओ नेक्सस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विभूती प्रसाद यांच्या कल्पनेतून ओ-लाईन-ओचा जन्म झाला. मुंबई मोबाईल रिटेलर्स वेल्फेअर असोसिएशनचेही ते अध्यक्ष आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांनी भारतातील मोबाईल रिटेल क्षेत्राला अनेक क्रांतीकारी वळणे दिली असून या क्षेत्रात त्यांचे नाव मानाने घेतले जाते. आपल्या ओ-लाईन-ओ या नव्या व्यासपिठाबाबत बोलताना श्री. विभूती प्रसाद आनंद व्यक्त करत सांगतात, गेली अनेक वर्षे मी तंत्रज्ञान आणि रिटेल क्षेत्राशी संबंधित आहे. सर्वांत किफायतशीर व सुयोग्य उत्पादने व सेवा ग्राहकांना सर्वाधिक स्वस्त किंमतीत उपलब्ध करून द्याव्यात, असा माझा विश्वास आहे. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अनुभव प्रदान करण्यासाठी ओ-लाईन-ओ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर्जेदार उत्पादने व सेवा यांसाठी आम्ही आतूर असतो. म्हणूनच, ओ-लाईन-ओ या अभूतपूर्व मोहिमेचे धोरण व विचार जोपासण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनाही खास प्रशिक्षण देत आहोत.
ओ-लाईन-ओ बद्दल थोडेसे..
ऑफलाईन रिटेल सेवांसोबत ग्राहकांना ऑनलाईन मोबाईल शॉपिंगमधल्या सोयीस्करतेचा आनंद द्यावा, या हेतूने ओ-लाईन-ओची स्थापना करण्यात आली. ऑनलाईन शॉपिंग अनुभव ऑफलाईन डोअरस्टेप डिलीव्हरीसह ग्राहकांना देण्याचा प्रयत्न ओ-लाईन-ओ हे व्यासपीठ करते. अनुबव रिटेल व्यावसायिकांच्या समुहातर्फे सुरू करण्यात आलेल्या ओ-लाईन-ओ या व्यासपिठाच्या मुंबईतील 75 हून अधिक दालनांच्या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरवली जाते.
ग्राहक समाधानाच्या जोरावर ओ-लाईन-ओ कार्यरत असून याच कारणास्तव हा सेवाधारित ब्रॅण्ड म्हणून नावारुपाला येत आहे. ओ-लाईन-ओकडे मुंबईतील 75 हून अधिक दालने सांभाळणाऱ्या 39 रिटेलर्सची फळी तैनात असून दरमहा 33 कोटी रुपयांचा महसूल यातून मिळतो. ओ-लाईन-ओशी संलग्न प्रत्येक रिटेलरला टेलिकॉम उद्योगक्षेत्राचा किमान 20 वर्षांचा अनुभव आहे. 2019 च्या दिवाळीपूर्वी एकूण 200 दालने उभारण्याचा आमचा विचार आहे. ग्राहकांना व्यक्तिगत खरेदीचा अद्वितीय अनुभव देण्यासाठी आम्ही संपूर्णतः कटीबद्ध आहोत.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...