Monday, October 5, 2020

                                                                    स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत होणार

शिवबांचा विवाह-सोहळा


जिजाऊ लावणार शिवबा आणि साईबाई यांचं लग्न 'स्वराज्यजननी   जिजामाता  विवाह-सप्ताह विशेष-१० ऑक्टोबर

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची  पुनर्बांधणी सुरू केली आहेशहाजी राजांनी पाठवलेली कवड्यांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोतहे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवड्यांची माळ अभिमानानं   परिधान केली.

दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महतत्त्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेतलवकरच शिवबा आणि सईबाई यांचा विवाह-सोहळा पार पडणार आहेशिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना

पाहायला मिळणार आहे.

जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला याला बरीच राजकीय कारणं होतीस्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतंशिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोचू शकले नाहीततेव्हा जिजाऊंनी एकट्यांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेललीही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्यातितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नयेह्यासाठी शत्रू पक्षकरत होतापण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना एकट्या स्त्रीनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत  ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर प्रेक्षकांना 'विवाह सप्ताह'पाहायला मिळणार आहेमुलखावेगळ्या आईची ही गाथा आता रंजक अशा वळणावर येऊन पोचली आहेजिजाऊ रयतेचा जाणता राजा घडवत आहेत

पाहा,

'स्वराज्यजननी जिजामाता'  सोमवार ते शनिवार रात्री :३० वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.










No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...