आदिवासी, महिला
आणि बालविकास मंत्री 'सत्यवती राठोड' यांच्या हस्ते 'सेवाभाया' प्रेक्षकांना
अर्पण
'सेवा भाया' या गाण्यातून
संजीव कुमार राठोड संगीत निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. हे गाणं म्हणजे
सिंधू संस्कुतीचे वारसदार असलेले गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत, जगतगुरू संत सेवालाल महाराज यांना करण्यात आलेली अरदास अर्थात प्रार्थना आहे.
नुकतंच या गाण्याला प्रेक्षकांना समर्पित करण्यात आले असून 'सेवाभाया' गाण्याला अनेकांनी पसंती दाखवली आहे.
संजीव कुमार राठोड
यांनी सुरु केलेल्या जे जे पी या संगीत निर्मिती संस्थेच हे पहिलंच गाणं असून हे
गाणं श्री.संत सेवालाल यांचे वशंज डॉ. संत श्री. रामराव महाराज व त्यांच्या
कार्याला समर्पित केल आहे. बहुजनांना व खास करून गोर बंजारा समाजाला योग्य दिशा
देण्याच काम आजन्म संत श्री रामराव महाराज यांनी केल समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन
व व्यसनमुक्ती साठी त्याचं काम अजरामर आहे. असून त्यांच्या कार्याचा गौरव या
गाण्यातून करण्यात येत आहे. गाण्याची गंभीरता आणि संवेदनशीलता समजून घेता या
गाण्याचे नुकतच हैद्राबाद येथे तेलंगणा सरकारच्या आदिवासी,
महिला
आणि बालविकास मंत्री 'सत्यवती राठोड' यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला व्ही श्रीनिवास गौड
उत्पादन शुल्क मंत्री, तेलंगणा सरकार, श्री वाल्या रामावथ नाईक अध्यक्ष गिरिजन को-ऑपरेटिव्ह कॉर्पोरेशन लिमिटेड
तेलंगणा सरकार आणि अनेक खासदार, आमदार आणि हजारो बंजारा
समाजातील लोकांसह इतर मान्यवर आणि इतर समाजातील लोक देखील उपस्थित आहेत. हा
उद्घाटन सोहळा जल्लोषात आणि फार उत्साहात पार पडला. या गाण्याची निर्मिती
संजीवकुमार राठोड यांनी असून या गाण्याचे बोल गीतकार राष्ट्रीय पुरस्कार विजेता
ख्वाडा या चित्रपटाचे गीतकार श्री. विनायक पवार यांनी लिहिले असून पद्मावत आणि
पीके या चित्रपटाचे गायक स्वरूप खान यांच्या सुमधुर आवाजात संगीतकार नितीन सावंत यांनी संगीतबद्ध केलं
आहे. या गाण्याच्या निमित्ताने संत सेवालाल महाराज आणि त्यांचे वंशज डॉ. संत श्री.
रामराव महाराज यांच्या कार्याची महती सांगणार हे गाणं लोकांना भावेल हे नक्कीच, तसेच कलाकार आणि समाजाचा एक भाग म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती मी या अशा
निर्मिती मधून पार पाडत आहे असे संजीवकुमार राठोड सांगतात.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST