Friday, April 8, 2022

संजीवकुमार राठोड यांची बंजारा समाजाचे धर्मगुरू कै. रामराव बापू महाराज यांना 'सेवाभाया' या गीतामधून श्रद्धांजली.

 संजीवकुमार राठोड यांची बंजारा समाजाचे धर्मगुरू कै. रामराव बापू महाराज यांना 'सेवाभाया' या गीतामधून श्रद्धांजली.


 लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आमदार निवास या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजीव कुमार राठोड हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच चांगलच प्रकाश झोतात आले आहेत. चित्रपट क्षेत्रासोबतच ते संगीत क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला जम बसवायला सुरूवात केली आहे. 'सेवा भाया' या गाण्यातून संजीव कुमार राठोड संगीत निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. हे गाणं म्हणजे सिंधू संस्कुतीचे वारसदार असलेले गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत, जगतगुरू संत सेवालाल महाराज यांना करण्यात आलेली अरदास अर्थात प्रार्थना आहे.

संजीव कुमार राठोड यांनी सुरु केलेल्या जे जे पी या संगीत निर्मिती संस्थेच हे पहिलंच गाणं असून हे गाणं श्री.संत सेवालाल यांचे वशंज डॉ. संत श्री. रामराव महाराज व त्यांच्या कार्याला समर्पित केल आहे. बहुजनांना व खास करून गोर बंजारा समाजाला योग्य दिशा देण्याच काम आजन्म संत श्री रामराव महाराज यांनी केल समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती साठी त्याचं काम अजरामर आहे. असून त्यांच्या कार्याचा गौरव या गाण्यातून करण्यात येत आहे. या गाण्याचे बोल गीतकार राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा या चित्रपटाचे गीतकार श्री. विनायक पवार यांनी लिहिले असून पद्मावत आणि पीके या चित्रपटाचे गायक स्वरूप खान यांच्या सुमधुर आवाजात  संगीतकार नितीन सावंत यांनी संगीतबद्ध केलं आहे.



या गाण्याच्या निमित्ताने संत सेवालाल महाराज आणि त्यांचे वंशज डॉ. संत श्री. रामराव महाराज यांच्या कार्याची महती सांगणार हे गाणं लोकांना भावेल हे नक्कीच, आपल्या संतांच्या आपल्या जडणघडणीत मोठा वाटा असतो, सध्याच्या परिस्थितीत एक सकारत्मक ऊर्जेसाठी या गाण्याची निर्मिती करत आहोत असे जे जे पी म्युझिकचे संचालक संजीवकुमार राठोड सांगतात.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...