Saturday, April 9, 2022

 इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा!

 

पाहासोमवार-बुधवाररात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

'इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय.  'अभिमान देशाचाआवाज महाराष्ट्राचाहे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्नं घडवतो आहेअखेरीस महाराष्ट्राला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेतअंतिम फेरीसाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहेयंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा येणार आहेत.


Saffrons news Networks

 

लक्ष्मीकांत-प्यारेलाल (ऊर्फ एल.पीकिंवा लक्ष्मी-प्यारेही एक सुप्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार जोडी होतीअनेक हिंदी चित्रपटांना यांनी संगीत दिले आहेया जोडीतले प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यंदाच्या आठवड्यात सुरांच्या मंचावर येणार आहेतते स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेतयंदाचा आठवडा खरंच खास असणार आहेलक्ष्मीकांतप्यारेलाल या लोकप्रिय जोडीने संगीतबद्ध केलेली गाणी स्पर्धक सादर करणार आहेतप्यारेलाल सुरांच्या मंचावर किश्शांचा आणि आठवणींचा पेटारा उघडणार आहेतत्यांचा अनुभव ते या नवीन पिढीबरोबर शेअर करणार आहेत.

 

प्यारेलाल यांची  गाणीत्यांनी सांगितलेले किस्से हे सगळं पाहण्यासाठी, 11,12 आणि 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता  'इंडियन आयडल मराठीफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...