Thursday, December 1, 2022

प्रवाहाविरुद्ध पोहू पाहणाऱ्या संजीवनीच्या स्वप्नांची सत्याशी लढाई लग्नानंतर होणार का सुरु? सन मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'शाब्बास सुनबाई' एका रोमांचकारी वळणावर

 प्रवाहाविरुद्ध पोहू पाहणाऱ्या संजीवनीच्या स्वप्नांची सत्याशी लढाई लग्नानंतर होणार का सुरु?

सन मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'शाब्बास सुनबाईएका रोमांचकारी वळणावर


लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नं, स्वप्नंच  राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल ह्यातच अडकून राहतातपण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं  पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई'. आपली स्वप्नं  न विसरता त्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या  आणि  समोर येईल त्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीची आपल्या लाडक्या सन मराठी ह्या वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली 'शाब्बास सुनबाईही  मालिका तुम्हाला नक्कीच आवडेल.

जगाच्या स्पर्धेत नेहमी पहिलं येण्यासाठी वडिलांनी घडवलेल्या संजीवनीला तिच्या स्वप्नांसाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे तिच्या लग्नानंतर. ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठित येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्र लग्नानंतर फिरली. संजीवनीला नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? 'शाब्बास सुनबाईम्हणणाऱ्या अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहेअप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय थोडक्यातसंजीवनीच्या स्वप्नांसाठी तिचं लग्न विघ्न ठरणार की  प्रवाहा विरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणारजाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नकानवी मालिका "शाब्बास सुनबाई". सोमवार ते शनिवार रात्री ७ वा. फक्त आपल्या सन मराठीवर.

संजीवनीच्या भूमिकेत रश्मी अनपट तर अप्पांच्या भूमिकेत मयूर खांडगे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी केलं आहेतर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती "सुचित्रा आदेश बांदेकर" यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता 'जाऊ नको दूर… बाबा!', रात्री ८ वाजता 'माझी माणसं', ८.३० वाजता 'कन्यादान', रात्री ९ वाजता 'संत गजानन शेगावीचे', ९. ३० वाजता 'नंदिनीतसेच रात्री १० वाजता 'सुंदरीह्या मालिका दाखविल्या जातात.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...