Thursday, December 1, 2022

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी घेतले कार्ला येथे एकवीरा आईचे दर्शन.

 सोनी मराठी वाहिनीवरील
 'आशीर्वाद तुझा एकवीरा आईमालिकेतील कलाकारांनी घेतले कार्ला येथे एकवीरा आईचे दर्शन. 


                     सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेत्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहेसमकालीन मालिकांबरोबरच 'ज्ञानेश्वर माउली', 'गाथा नवनाथांची'अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता सोनी मराठी ही लोकप्रिय वाहिनी एकवीरा आईचा महिमा दाखवणारी 'आशीर्वाद तुझा एकवीरा आईही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे.  एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहेआगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही  हे कुलदैवत आहेपौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते.  तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.


                      'आशीर्वाद तुझा एकवीरा आईमालिकेतील कलाकारांनी  कार्ला (लोणावळायेथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.  या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघअभिनेत्री अमृता पवारमालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकरलेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकरसोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकरसोनी मराठी फ़िकशन हेड - सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आईया मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही प्रमुख भूमिकेत असणार आहेतर अभिनेत्री मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहेआतापर्यंत आपण मयूरीला अनेक आव्हानात्मक भूमिका साकारताना पाहिले आहेमात्र या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावतेहे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  त्या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईरअभिनय सावंतसविता मालपेकरमिलिंद सफईधनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'  येत्या 28 नोव्हेंबरपासूनसोम.- शनि., रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

            


'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'  या मालिकेचे दोन वेगवेगळे उत्कंठावर्धक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यातील आशयावरून असे लक्षात येते की  कलियुगातल्या दानवांचा नाश करण्यासाठी आणि संकटातून आपल्या भक्तांना तारण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन एकवीरा आई येत आहे.'आशीर्वाद तुझा एकवीरा आईया  मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर झाले आहेहे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहेएकवीरा आईचे भक्त या गीतावर नक्कीच ताल धरतील यात शंका नाही
              'आशीर्वाद तुझा एकवीरा आईमालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणालीया मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे.  एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेतअनेकांनी ते अनुभवले आहेतसंकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पाहायलाही मिळणार आहेत.  कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराला वाटतआजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेतमात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होतत्याच वेळेस एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आलीयामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारन ही खूप मोठी जबाबदारी आहेएकवीरा आईच्या भक्तांना ही मालिके आवडेल अशी अपेक्षा आहे.



अभिनेत्री अमृता पवार म्हणाली,'आशीर्वाद तुझा एकवीरा आईया मालिकेत तानिया नावाची भूमिका की साकारत आहेएकवीरा आईचे लाखों भक्तगण आहेतत्यातलीच एक तानिया असून तिची एकवीरा आईवर खूप श्रद्धा आहेअनेक संकटातून एकवीरा आई तानियाला मार्ग दाखवतेहा भक्तिमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे." या मालिकेची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखकअभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रॉडक्शन ने केली आहेविशेष म्हणाले चिन्मय मांडलेकर स्वतः या मालिकेचे लेखन करत आहेत.  या मालिकेत  एकवीरा आई आणि तिच्या भक्तांचे अतूट नाते बघायला मिळणार आहेतेंव्हा पाहायला  विसरू नका आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'  येत्या 28 नोव्हेंबरपासूनसोम - शनिरात्री 8 वाजता.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...