Friday, March 8, 2024

सन मराठी घेऊन येतेय, रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

    सन मराठी घेऊन येतेयरावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

 



एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार, अशी ही अनोखी, मनोरंजक कथा घेऊन 'सन नेटवर्क'ची 'सन मराठी' वाहिनी 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवीन मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

'कॉन्स्टेबल मंजूही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहेनुकतीच या मालिकेची झलक रिलीज झाली आणि मंजुचा स्वभाव सर्वांना कळला असेल.

 

                                            


मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या 'वाघमारे' या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.

पोलिस या पदाला शोभेल अशी धीट कामं करण्यापेक्षा  स्टेपलरमध्ये स्टेपलर पिन टाकणेफाईल्स लावणेकागदपत्रे भरणेज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणेदेवाची पूजा करणे ही क्षुल्लक कामे ती पोलीस स्टेशनमध्ये एका दिवसात पार पाडतेपोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाहीउलटकोणताही गुन्हा घडूच नयेअशी ती देवाकडे प्रार्थना करते.  खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता.  पण परिस्थिती अशी होती की तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. ‘शी इज गुड फॉर नथिंग’, हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जातेत्यामुळेमंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते.

 



एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्यास्वभावाने अगदी रावडीतो बोलण्यापूर्वी त्याचे हात पाय आधी बोलतातपण मनाने तितकाच सच्चाराजकारणावर इतका जीव की तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते.  सत्याला त्याच्या सारखीच धाडसी पत्नी हवी आहेत्याच्या लग्न मंडपातचपोलिस एका वॉन्टेड गुन्हेगाराचा शोध घ्यायला पोहचतातपोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतोप्लॅननुसार कोणत्याही कामात रस नसलेल्या मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तिने वधूच्या ठिकाणाहून हलायचं नाही असा कडक आदेश तिला दिला जातोपण कट रचला जात असतानामंजूच्या लग्नाची गाठ सत्यासोबत बांधली जाते.

 

आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का?  दोघांचं एकमेकांसोबत जमेल का?  सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल काआत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का?  या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील.

 

संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजूया मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहेया मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथापटकथा लिहिली आहेभिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री  वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...