Tuesday, March 19, 2024

सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच होणार रंगपंचमी महासंगम!

 सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच होणार रंगपंचमी महासंगम!

      

                  सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतेनवीन मालिकानवे  महाएपिसोडमोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण हे सगळं सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतेआता लवकरच होळी आणि रंगपंचमी येणार आहेतत्याची सर्वत्र धूम आहेचपण होळी आणि रंगपंचमी यांचे निमित्त साधून सोनी मराठीदेखील प्रेक्षकांसाठी विशेष असं काही घेऊन येणार आहेसोनी मराठी वाहिनीवर रंगपंचमी महासंगम पहिल्यांदाच होणार आहेमहासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्यांच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणार्‍या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेतसोनी मराठीवर पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहेनेहमी निरनिराळ्या मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍याप्रेक्षकांना आवडणार्‍या ह्या व्यक्तिरेखा रंगपंचमीसाठी एकत्र येऊन किती मजा करताहेतहे आपल्याला येत्या सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी  वाजता पाहता येणार आहे



                  'अबोल प्रीतीची अजब कहाणीमालिकेतील सराफ परिवाराने सोनी मराठीवरील या सगळ्या व्यक्तिरेखांना आपल्या घरी होळी पार्टीनिमित्त एकत्र बोलावले आहेयामिनी सराफ यांनी या सगळ्याचं आयोजन केलं असून राजवीर आणि मयूरी हे या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणार आहेतया पार्टीमध्ये 'वीरू आणि प्राजक्ता', 'मीरा आणि मल्हार', 'बयो आणि डॉविशाल', 'यशोधन आणि असीमहे सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेतया रंगपंचमी पार्टीमधील प्रमुख बाब म्हणजे या कलाकारांचे पेहेरावसगळ्या जोड्या वेगवेगळ्या रंगांचं प्रतिनिधित्व करणार आहेतरंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसताततशाच निरनिराळ्या रांगांमध्ये हे कलाकार आपल्याला दिसतीलशिवाय या महासंगममध्ये या प्रत्येक कलाकाराचे विशेष असे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेहोळी विशेष आणि प्रेक्षकांना आवडणार्‍या निरनिराळ्या गाण्यांवर हे कलाकार  थिरकताना दिसणार आहेतआजवर कधी झालं नाही ते आता या रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहेसगळे कलाकार एकत्र थिरकतानाही आपल्याला दिसतील आणि हे सगळे एकत्र आल्यावर प्रेक्षकांना धमाल तर नक्कीच येणारसगळे कलाकार आपल्या नेहमीच्या पेहरावात  दिसता विशिष्ट पेहरावात दिसणार आहेत.

                  एवढ्या सगळ्यांच्या येण्याने मयूरी आणि राजवीर यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणार कामयूरी आपले राजवीरवरील प्रेम व्यक्त करेल काहे पाहणंही महत्त्वाचं असेलत्याशिवाय मयूरी बॉडीगार्डच्या वेशात पार्टीमध्ये राजवीरसोबत असणार असेलतर ती या सगळ्यांचं आदरातिथ्य करायला मयूरीच्या वेशात कशी येणारहे पाहणं फार उत्सुकतेचं असेलमयूरी हीच बॉडीगार्ड आहे कात्याशिवाय यामिनी आणि जोजो मिळून मयूरीला त्रास देण्यासाठी काही विशिष्ट प्लॅन करतील काहे सगळं आपल्याला रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहेततर तुम्हीपण नक्की या  'अबोल प्रीतीची अजब कहाणीमालिकेतल्या सराफांच्या घरातल्या या होळी पार्टीलारंगपंचमी महासंगम सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी  वाजल्यापासून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...