Tuesday, June 25, 2024

सन मराठीच्या 'तिकळी' या मालिकेत कोण असणार तिकळीचा जोडीदार? सन मराठीवरील नवी मालिका 'तिकळी' येणार आपल्या भेटीला 1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता.


 सन मराठीच्या 'तिकळी' या मालिकेत कोण असणार तिकळीचा जोडीदार? सन मराठीवरील नवी मालिका  'तिकळी' येणार आपल्या भेटीला 1 जुलैपासून सोम  ते शनि रात्री 10 वाजता.



प्रेक्षकांची उत्सुकता वाढली!'तिकळी' या सन मराठीच्या रहस्याने दडलेल्या मालिकेत आता दिसणार 

 पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर.1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता ही मालिका आपल्या भेटीला.  सन

 मराठी वाहिनी ही एकापेक्षा एक हटके विषय आपल्या प्रेक्षकवर्गासाठी घेऊन येतच असते त्यातच आता सन मराठी

वाहिनी काहीतरी नवं करू पाहते.कौटुंबिक गोष्ट, सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे


मनोरंजन करतच असते, पण यंदा सन मराठी वाहिनीने एका वेगळ्या विषयात हाथ घातला आहे.सन मराठी


आपल्या प्रेक्षकांसाठी  मालिकेच्या रूपात एक नवी आणि थरारक कथा घेऊन आले आहेत त्यात या मालिकेच्या

प्रोमो ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळ कुतूहल निर्माण केलं आहे. तिकळी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो लोक इतकं  भरभरून प्रेम देत आहेत,  

अगदी झपाट्याने हा टिझर वायरल होत असताना लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

कॉमेंट्सद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकळी या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्या झाल्या प्रेक्षकांचे या

मालिकेप्रती एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहेत. 

प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं हवंच असतं त्यात आता ही तिकळी कोण ? हिचं रहस्य काय, जीच्यासोबत

गावकरी दोन हाथ लांब राहतात, जीचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणे, तिकळीला दिसणारी ती

व्यक्ती कोण, व त्या व्यक्तीचं नेमकं  रहस्य काय अशा सगळ्या गोष्टी या मालिकेतून उलगडीस येणार आहेत.



वैष्णवी कल्याणकर ही अभिनेत्री या मालिकेत तिकळी चे प्रमुख पात्र साकारणार आहे व तिच्या जोडीला

अभिनेत्री पूजा ठोंबरे सहकलाकार म्हणून तिची भूमिका सुद्धा रहस्मय असणार आहे. 

पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघींच्या रहस्यमय नात्यामागे काय कारण असणार हे आपल्याला


पाहता येणार आहे. बरं या मा
लिकेत आपल्याला हिरोईन कोण आहे ते समजलेच आहे परंतु तिकळीच्या जोडीला

तिचा हीरो कोण असणार, तिकळी जसं म्हणते तिला समजून घेणारा, तिला तिच्या अस्तित्वा सकट

स्वीकारणारा असा मुलगा कोण असेल?  हे खरंतर गूढ रहस्य आपल्याला  येत्या 1 जुलैपासून कळणार आहे.

तिकळीची थरारक अशी रहस्यमय कथा प्रेक्षकांचा भेटीला येणार असून,आता जास्त वाट न पाहता ही मालिका

1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर प प्रसारित होणार आहे.

या मालिकेचं सत्य येत्या 1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर उलगडणार

आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...