Thursday, June 6, 2024

'तू भेटशी नव्याने' मालिकेचा मुहूर्त झाला आणि चित्रीकरणाला दणक्यात सुरुवात.

 'तू भेटशी नव्यानेमालिकेचा मुहूर्त झाला आणि चित्रीकरणाला दणक्यात सुरुवात.

                   

                   'तू भेटशी नव्यानेमालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहेमालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहेमालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्याची बातमी समोर येते आहेसोनी मराठी वाहिनीने 'तू भेटशी नव्यानेमालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहेमालिकेच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत मुहूर्त पार पडलामुहूर्ताची पूजा करत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीमालिकेच्या चित्रकरणाचा हा पहिला दिवस आणि मुहूर्त शूट च्या वेळी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अन्य कलाकार आणि तंत्रज्ञान उपस्थित होतेसोबतच मालिकेशी जोडले गेलेले अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांचीही  उपस्थिती होतीमालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर यांनी सेटवर मालिकेच्या मुहूर्त निमित्त पूजा देखील केलीचित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार यात काही शंका नाहीमुहूर्ताची छायाचित्रे कलाकारांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर करत नवी सुरुवात झाल्याचे सांगितले आहेमुहूर्ताच्या वेळी सोनी मराठी वाहिनीचा चमू तसेच मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर आणि त्यांचा चमूसुद्धा उपस्थित होता.  



                     सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहतेमालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतातसोनी मराठी वाहिनीवर नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेहा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेतमालिकेचे नाव आहे ‘तू भेटशी नव्यानेया मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहेअभिनेता सुबोध भावे हा यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपटविविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेतशिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहेआताही  या नव्या व्यक्तिरेखेतील मालिकेवर प्रेक्षक विशेष प्रेम करतील याबाबत शंका नाहीमालिकाविश्वात  आयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे२५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडेल यात शंका नाहीतर पाहायला विसरू नका, ‘तू भेटशी नव्यानेही मालिका लवकरच सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...