Wednesday, July 9, 2025

सोनी BBC अर्थवर जुलैमध्ये सादर होणार हे थरारक कार्यक्रम

  सोनी BBC अर्थवर जुलैमध्ये सादर होणार हे थरारक कार्यक्रम



सोनी BBC अर्थ प्रेक्षकांना अभ्यासपूर्ण आणि साहसी जुलैचा आनंद घेण्यासाठी आवाहन करत आहेया महिन्यात इन्साइड  फॅक्टरी च्या सीझन 9 मध्ये दैनंदिन उत्पादनांच्या मागील अद्भुत प्रक्रिया कशा असतात हे प्रेक्षकांना बघायला मिळेल मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन सह प्रेक्षक धमाल आणि डोळे उघडणाऱ्या जागतिक प्रवासाचा आनंद घेतील. ‘वॉन्डर विथ  बेस्ट या संकलनासह ही वाहिनी काही चित्तथरारक मोहिमांचा प्रवास सादर करणार आहे.



 14 जुलै 2025 पासून सुरू होत आहेयामध्ये युरोपच्या काही प्रचंड मोठ्या फॅक्टरीज आतून बघता येतीलतेथील इनोव्हेशनकौशल्य आणि लोकप्रिय पदार्थ किंवा वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी लागणारी मशीनरी पाहता येईलपॅडी मॅकगिनेस या नवीन सादरकर्त्यासोबत ही मालिका फॅक्टरी फ्लोरच्या पलीकडे जाते आणि इतिहासकार रूथ गुडमनसोबत उत्पादनांचे जबरदस्त मूळ आणि त्यांच्या मागील यशोगाथा शोधतेचेरी हीली चीज कर्ल्सचॉकलेट सीशेल्सफ्लॅपजॅक्स आणि हार्डबॅक पुस्तकांच्या मागच्या शास्त्राचा शोध घेताना दिसेलगोष्टी कशा बनवल्या जातात यांचे छुपे विश्व आतून बघण्यासाठी हा नवीन सीझन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे.



यानंतर28 जुलै 2025 रोजी  मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथनचा प्रारंभ होत आहेया मालिकेत कॉमेडीयन रोमेश रंगनाथन प्रेक्षकांना जगातील काही अनपेक्षित पर्यटन स्थानांवर घेऊन जाण्याचे धाडस करताना दिसेलही ठिकाणे आहेतहैतीइथियोपियाअल्बेनिया आणि आर्क्टिकस्थानिक लोकांचे मार्गदर्शन घेत रोमेश तेथील उप



संस्कृतीविशिष्ट खाद्य पदार्थ यांचा शोध घेईल आणि जितकी म्हटली जातात तितकी ही स्थाने खरोखर आव्हानात्मक आहेत कातेथील सौंदर्य आणि मोहकता चकित करणारी आहे का याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रम हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत सादर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना अपारंपरिक प्रवासानुभवावर विचार करण्यास प्रेरित करतो.



रोमेशच्या धाडसी कारनाम्यांसोबत सोनी BBC अर्थ 14 जुलै 2025 पासून ‘वॉन्डर विथ  बेस्ट हे सुंदर पर्यटनाचे एपिसोड असलेले खास संकलन देखील सादर करणार आहेया विशिष्ट संकलनात प्रेक्षकांना विख्यात सादरकर्त्यांसोबत जगातील काही वैविध्यपूर्ण प्रदेश आणि संस्कृती यांचा शोध घेण्यास आमंत्रित करण्यात येत आहेयामध्ये ज्या मोहिमांचा समावेश आहेत्यामध्ये अॅलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग सोबत केलेला आईसलँडचा प्रवासजोआना लम्लीसोबत प्राचीन सिल्क रोडचा प्रवाससू पर्किन्ससोबत गजबजलेल्या जपानचा प्रवासदक्षिण कोरियाबाबत माहिती आणि सायमन रीव्हसोबत गंगा आणि श्रीलंकेचा अद्भुत प्रवास सामील आहेया विशेष कार्यक्रमांमधून अप्रतिम दृश्य अनुभव मिळेल आणि कुशल शोधकांच्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रहावरील सौंदर्य आणि विविधता साजरी होईल.



त्यामुळे या जुलैमध्ये सोनी BBC अर्थ आवर्जून बघा. ‘वॉन्डर विथ  बेस्ट आणि इन्साइड  फॅक्टरी हे कार्यक्रम 14 जुलैपासून अनुक्रमे रात्री 10:00 आणि रात्री 11:00 वाजता सादर होणार आहेततर  मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन 28 जुलैपासून रात्री 10:00 वाजता सादर होणार आहे.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...