Tuesday, July 1, 2025

तीराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थि

 येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न 

तीराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थि

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती.  या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!

राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर  धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’ 

रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’ 

चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून माझी अशी इच्छा होती की, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे यावेत आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. 'येरे येरे पैसा’ला रोहित शेट्टी आले होते आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे यावेळीही त्यांनी यावे, असे मनात होते. ‘येरे येरे पैसा ३’मध्ये आमची जबाबदारी तिपटीने वाढली होती. तिसरा भाग बनवताना आम्ही हेच लक्षात घेतलं आणि त्यामध्ये हसवणं, विचार करायला लावणं आणि गुंतवून ठेवणं, या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. मला खात्री आहे, तिसऱ्या भागावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील.'' 

निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणतात, “येरे येरे पैसा' ही फक्त मालिका नाही, ही मराठी सिनेमाच्या कमर्शिअल यशाची ओळख आहे. यावेळी आम्ही या या यशाची उंची आणखी वाढवली आहे. मराठी प्रेक्षक आता केवळ कौटुंबिक कथा पाहात नाहीत, त्यांना वेगळा अनुभव हवा असतो आणि ‘येरे येरे पैसा ३’ हा एक अफलातून अनुभव देईल, याची खात्री आहे.''

धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता यांनी सांगितले, “मराठी सिनेमा आता खूप वेगाने बदलत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट त्याचेच एक उदाहरण आहे आणि आम्हाला अशा दमदार मराठी चित्रपटाचा भाग होता आलं, हे भाग्य वाटतं.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...