Wednesday, July 16, 2025

२१ नोव्हेंबरला उलगडणार ‘असंभव’चा थरार

 २१ नोव्हेंबरला उलगडणार ‘असंभव’चा थरार 

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची एक अद्भुत कहाणी 

मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय. मात्र या सगळ्यामागे नक्की काय रहस्य दडले आहे, याचा उलगडा येत्या २१ नोव्हेंबरलाच होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केलं आहे. 

मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे,प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नैनीतालच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये करण्यात आलं असून नैनितालमध्ये चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक सचित पाटील आणि प्रथितयश निर्माते नितीन प्रकाश वैद्य पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. तर एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर, संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. 


दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री म्हणतात, '' 'असंभव’ ही अशी एक कथा आहे, जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. यात थरार आहे, भावना आहेत, प्रेमकहाणी आहे आणि गूढतेने भरलेली रचना आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात खोलवर उतरावा, यासाठी आम्ही प्रत्येक फ्रेमसाठी मेहनत घेतली आहे.”

निर्माते नितीन प्रकाश वैद्य चित्रपटाबद्दल म्हणाले, ‘’ ‘असंभव’ या चित्रपटाची संहिता ऐकताक्षणी ती खूप सकस असल्याचे जाणवले. कथा, पटकथा खूपच जबरदस्त असल्याने या चित्रपटाची निर्मिती आपण एकत्र करूया, असा आग्रह मी सचितला केला. पुढे आमच्या या प्रवासात उत्तम सहनिर्माते आणि तितकेच उत्तम तंत्रज्ञ सहभागी झाले. चित्रपट बनवताना कोणतीही तडजोड केली नसून सगळ्याच तांत्रिक बाबींवर खूप बारकाईने काम केले आहे. त्यामुळे खूपच दर्जेदार चित्रपट तयार झाला आहे आणि प्रेक्षकांच्या तो नक्कीच पसंतीस उतरेल, याची आम्हाला खात्री आहे.’’

एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर म्हणतात, ‘’ ‘असंभव’ हा एक अतिशय दर्जेदार चित्रपट आहे आणि या चित्रपटाची सहनिर्मिती करण्याची आम्हाला संधी मिळाली, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला खात्री आहे, ‘असंभव’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...