'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि दे धक्का-२ या चित्रपटाचा चमू एकत्र येणार आणि होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का २ विशेष कार्यक्रम!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का २ विशेष, ७ ऑगस्ट, रविवारी संध्या. ७ वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!
पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. पण ह्या आठवड्यात खास रसिकांसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का २ विशेष हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी घेऊन येतेय. दे धक्का २ या चित्रपटाचा संपूर्ण चमू हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहे. त्यामुळे दर्जेदार प्रहसने, नृत्ये आणि गाणी असं सगळं रसिकांना बघायला मिळणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर खुद्द निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर येणार आहेत. प्रेक्षकांना अनेक लोकप्रिय चित्रपट देणारे महेश मांजरेकर हास्यजत्रेच्या मंचावर हास्यरसिकांना मनापासून दाद देत, खळखळून हसताना दिसतील. याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे यांचीही उपस्थिती या मंचावर असणार आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी प्रहसनात काम केलं असल्यानं त्यांचं हास्यवीरांबरोबरचं काम बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. याबरोबरच मेधा मांजरेकर, गौरी इंगावले, सक्षम कुलकर्णी, अमेय खोपकर हे कलाकार हास्याच्या मंचावर उपस्थित राहून खळखळून हसणार आहेत. हास्यजत्रा आम्ही बघतो आणि आम्हांला हा कार्यक्रम खूप आवडतो, या कार्यक्रमातली सगळी पात्रं आमची लाडकी आहेत, असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. 'दे धक्का' ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दे धक्का २ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
चित्रपटाचा संपूर्ण चमू नक्की कशी धम्माल करणार, हे अनुभवण्यासाठी हास्यजत्रा पाहत राहा.
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का २ विशेष, ७ ऑगस्ट, रविवारी संध्या. ७ वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!