'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' हा फक्त मराठी वाहिनीवरील पहिला वहिला सोहळा प्रेक्षकांना समोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. दिग्गज कलाकारांनी जितकं भरभरून प्रेम या सोहळ्यावर केलं तितकच प्रेम महाराष्टातील जनता देखील करेल अशी मला खात्री आहे. फक्त मराठी या वहिनी मार्फत नवनवीन कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
शिरीष पटनशेट्टी (एम. डी - फक्त मराठी)
मराठी चित्रपट सृष्टीला पुरस्कार सोहळे हे काय नवे नाहीत म्हणूनच 'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' सादर करताना नावीन्यपूर्ण दृष्टिकोन महत्वाचा होता. नवनवीन कल्पना व आपल्या आवडत्या कलाकारांना पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी फक्त मराठी सिने सन्मान सोहळाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणारं आहे. 'फक्त मराठी सिने सन्मान सोहळा' हा मराठी चित्रपट सृष्टीच्या शिरेपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.
पल्लवी मयेकर (बिझनेस हेड - फक्त मराठी)