Thursday, April 17, 2025

पोलिसही म्हणताय, ‘थांब म्हटलं की थांबायचं’

 पोलिसही म्हणताय, ‘थांब म्हटलं की थांबायचं’

‘पी.एस.आय अर्जुन’ च्या टीझरला पोलिसांकडून पसंती! 



‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

 ‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री 

यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय 


रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील  (कृष्णा) आर्यन मेंगजी,  प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता हा चेहरा समोर आला आहे. तर हा चेहरा आहे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्रीण जाईचा. त्यामुळे आता ही  गँग एकत्र आल्याने 'एप्रिल मे ९९' ची सुट्टी अविस्मरणीय ठरणार हे नक्की !


जाईची भूमिका साकारणारी साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋतुजा देशमुख यांची मुलगी असल्याने अभिनयाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला आहे. ‘एप्रिल मे ९९’ ह्या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हुशार, समजुतदार, गोड, दिलखुलास अशी जाई या तीन मित्रांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसत आहे. 

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी मी साजिरीची ऑडिशन घेतली होती. परंतु त्या व्यक्तिरेखेशी ती मिळतीजुळती नसल्याने तिची निवड झाली नाही. परंतु तिची निरागसता, कुरळे केस, बोलके डोळे, हावभाव माझ्या लक्षात राहिले. त्यामुळे हे माझ्या मनात होतेच, की जेव्हा मी एखादा चित्रपट बनवेन तेव्हा साजिरीला नक्की एखादी भूमिका देणार. 'एप्रिल मे ९९' बनवताना साजिरीलाच डोक्यात ठेवून 'जाई'ची व्यक्तिरेखा लिहिण्यात आली. तिच्या अभिनयात सहजता व नैसर्गिकता असल्याने जाई अनेकांना आपल्यातलीच एक वाटेल. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले तशीच जाईही प्रेक्षकांना नक्कीच भावेल.'' 


निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ एप्रिल मे ९९ हा प्रत्येकाला नोस्टालजिक अनुभव देणारा चित्रपट आहे. त्यासाठी आम्हाला तीच निरागसता, खट्याळपणा असलेले चेहरे हवे होते आणि आर्यन, श्रेयस, मंथन व साजिरी यासाठी योग्य निवड आहे. साजिरीचे गोड हास्य, उत्तम अभिनय संपूर्ण चित्रपटाला ताजेपणा देतो.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'आतली बातमी फुटली' चित्रपटातून मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र

 'आतली बातमी फुटली' चित्रपटातून मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र


आजपर्यंत दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात काम करणे काही नवीन नाही; पण मराठीत असा सुवर्णयोग फार क्वचितच पाहायला मिळतो.  'आतली बातमी फुटली' या सिनेमाच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघांनी अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशा दोन कलासंपन्न कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. विशाल पी.गांधी आणि जैनेश इजरदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  येत्या ६ जूनला  'आतली बातमी फुटली'  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

या दोन दिग्गजांची चित्रपटात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या दोघांच्या अभिनयाची वेगळी केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सामान्य माणसाच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकांनी वर्तमानातील कटू सत्य पडद्यावर सादर केलं आहे.


  वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी व जैनेश इजारदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तरसंकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी रचली आहे, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवादलेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने 'आतली बातमी फुटली' या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे



Wednesday, April 16, 2025

विप्रोने घोषित केले 31 मार्च 2025 रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीचे परिणाम

विप्रोने घोषित केले 31 मार्च 2025 रोजी समाप्त 

होणाऱ्या तिमाहीचे परिणाम

Q425 मध्ये निव्वळ उत्पन्न QoQ 6.4% वाढले, तर FY’25 मध्ये ते YoY 18.9% वाढले

Q4 मार्जिन 17.5% असून ते YoY 1.1% वाढले आहे

लार्ज डील बुकिंग YoY 48.5% वाढले आहे

बंगळूर, भारत – 16 एप्रिल 2025: विप्रो लिमिटेड (NYSEWITBSE: 507685, NSEWIPRO) या आघाडीच्या टेक्नॉलॉजी सेवा आणि कन्सल्टिंग कंपनीने 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी इंटरनॅशनल फायनॅनष्यल रीपोर्टिंग स्टँडर्ड्स (IFRS) अंतर्गत आपले आर्थिक परिणाम घोषित केले आहेत. 


परिणामांमधील ठळक विशेष

1.     एकंदर उत्पन्न 22,500 कोटी रु. ($2,634.2 मिलियन1) आहे, यात QoQ 0.8% आणि YoY 1.3% वाढ झाली आहे.

2.     या तिमाहीचे निव्वळ उत्पन्न 3570 कोटी रु. ($417.8 मिलियन1) आहे, जे QoQ 6.4% आणि YoY 25.9% वाढले आहे.

3.     एकंदर बुकिंग्ज$3,955 मिलियन आहेत. लार्ज डील बुकिंग्ज4 $1,763 मिलियन असून ती स्थिर चलनात2 48.5% वाढली आहेत.

4.     या तिमाहीसाठी IT सेवांचे ऑपरेटिंग मार्जिन5 17.5% असून ते QoQ स्थिर आहे तर त्यात YoY 1.1% वाढ झाली आहे.

5.     या तिमाहीसाठी प्रती शेअर उत्पन्न 3.4 रु ($0.041) असून त्यात QoQ 6.2% आणि YoY 25.8% वाढ झाली आहे.

 

विप्रोने आज जाहीर केले की, 31 मार्च 2025 रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीत कंपनीने 22,500 कोटी रु. ची एकूण प्राप्ती केली आहे आणि 3,570 कोटी रु. नफा कमावला आहे. या तिमाहीसाठी IT सेवा मार्जिन 17.5% आहे, जे YoY आधारावर 1.1%ने वाढले आहे. या तिमाहीत, कंपनीने $1,763 मिलियन ची मोठी डील्स बुक केली, जी स्थिर चलनात YoY 48.5% जास्त आहेत.

CEO आणि मॅनिजिंग डायरेक्टर श्रीनि पल्लीया म्हणाले, “दोन भली मोठी डील्स जिंकून, लार्ज डील्स बुकिंग्जमध्ये वाढ करून, आमच्या श्रेष्ठ खात्यांत वाढ करून आणि अर्थात ग्राहकांचा संतोष आणखी वाढवून आम्ही या वर्षाचे समापन केले. शिवाय, आमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे चालू ठेवत आणि कन्सल्टिंग आणि AI क्षमता वाढवत आम्ही मार्जिन सुधारली. मॅक्रो एनव्हायर्नमेंटमधील आत्यंतिक अनिश्चिततेमुळे ग्राहक सावध असल्याने आमचे लक्ष निरंतर लाभदायक वृद्धीसाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना या कालावधीत मार्गदर्शन करण्यावर आहे.”

'जारण'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अमृता सुभाष or 'जारण'मध्ये झळकणार अमृता सुभाष

'जारण'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अमृता सुभाष  or 'जारण'मध्ये झळकणार अमृता सुभाष 


हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित 'जारण' या भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडले असतानाच आता या चित्रपटातील एक चेहरा समोर आला आहे. या चित्रपटात चौकटीबाहेर जाऊन आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 'जारण' हा मानवी भावना आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास असून यात अनेक रहस्ये लपली आहेत, जी प्रेक्षकांना थरारक अनुभव देतील. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अमृता सुभाषच्या चेहऱ्यावर टाचण्या टोचलेल्या दिसत असून डोळे बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे रहस्य चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे. 


या भूमिकेबद्दल अमृता सुभाष म्हणते, '' मला नेहमी असे वाटते की कलाकाराने एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरताच मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडते. माझ्या इतर भूमिकांच्या तुलनेत अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती. परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. ज्यावेळी मी 'जारण'चे स्क्रिप्ट वाचले तेव्हाच हा चित्रपट करण्याचे ठरवले.  माझ्या भूमिकेबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही, मात्र हे आवर्जून सांगेन, ही एक अशी रहस्यमय कथा आहे, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल.''   


ए अँड सिनेमाज एलएलपी प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी 'जारण'चे निर्माते आहेत.

Dinesh Vijan, Maddock Films and Sony Music India drop the love song of the year - Koi Naa- from Rajkummar Rao and Wamiqa Gabbi starrer Bhool Chuk Maaf!

Dinesh Vijan, Maddock Films and Sony Music India drop the love song of the year - Koi Naa- from Rajkummar Rao and Wamiqa Gabbi starrer Bhool Chuk Maaf!

Rajkummar Rao & Wamiqa Gabbi light up the screen with their chemistry in the latest song Koi Naa, a romantic track composed by Tanishk Bagchi and Gifty.

Following the buzz around its captivating trailer, the much-awaited romantic comedy, from the house of Dinesh Vijan and Maddock Films - Bhool Chuk Maaf is back in the spotlight with the launch of its first track, ‘Koi Naa’. The teaser has already stirred excitement among fans, giving a glimpse of what’s in store. Backed by the visionary Dinesh Vijan, Bhool Chuk Maaf continues Maddock Films’ streak of delivering heartfelt and refreshing stories. Directed by Karan Sharma, the film stars the ever-versatile Rajkummar Rao and the talented Wamiqa Gabbi in the lead roles of Ranjan Tiwari and Titli Mishra. The film is set for a global release on May 9, 2025.

‘Koi Naa’ beautifully captures the dreamy and romantic essence of Bhool Chuk Maaf, offering a glimpse into the charming world of Ranjan and Titli. A soft and dreamy love anthem, the track explores silent glances, fleeting moments, and the delicate beginnings of love. With its tender lyrics and moving vocals, the song highlights the emotional heartbeat of the film. Composed by the enigmatic Tanishk Bagchi and Gifty, with poignant lyrics by Irshad Kamil, and produced by Tanishk Bagchi & Ganesh Waghela, the song is beautifully sung by Harnoor and Shreya Ghoshal - a musical pairing that radiates chemistry and charm. The music video offers a visual treat, packed with playful, romantic scenes between Rajkummar and Wamiqa, giving fans a peek into their delightful on-screen chemistry. It sets the perfect mood for the emotional and entertaining journey the film promises.

Sharing his excitement, Rajkummar Rao said, “The response to the trailer has been truly overwhelming, it’s always incredibly fulfilling when audiences connect with your work. With Koi Naa, we’re now adding a whole new romantic layer to the story. The song captures the quiet, unspoken emotions of love in such a beautiful way, it brings depth and soul to Ranjan and Titli’s journey. The first time I heard the track; I was completely hooked. It’s been on loop ever since! A big shout out to the entire music team for crafting such a heartfelt and vibey track.”

Wamiqa Gabbi, who brings elegance and effortless charm to the screen, added, “Shooting for ‘Koi Naa’ with Rajkummar was a blast! It’s hands down one of my favourites from the Bhool Chuk Maaf album. It makes you want to dream, feel, and just lose yourself in its rhythm. We hope everyone feels the same magic we felt while filming it.”

The singer of Koi Naa, Shreya Ghoshal, shared, “Bringing this track to life has been such an exciting ride! From the very first note, ‘Koi Naa’ pulls you into the whimsical world of Bhool Chuk Maaf. It's got the energy of love, and a beat that makes you move. Can’t wait for everyone to vibe with it!”

Harnoor, the singer of the track added, “‘Koi Naa’ is about the beauty of falling in love and how it captures the most raw and vulnerable state of two individuals who are in love. For me Koi Naa is something very special as it not only beautifully captures the emotion of love but it also gave me a chance to collaborate with one of India’s most talented singers, Shreya Ghoshal. I am grateful to be a part of this multi-talented team. in unexpected ways. We wanted to bring an experience that mirrors the emotional journey of the movie, captures the essence of Ranjan and Titli's character. 

Music composer Tanishq Bagchi said, “With Koi Naa, we wanted to create a timeless, all-consuming love track- something that lingers with you. Thanks to Irshad’s evocative lyrics and the amazing voices of Shreya Ghoshal and Harnoor, and our full-hearted production, I think we’ve hit the right note.”

Irshad Kamil added Creating 'Koi Naa' for 'Bhool Chuk Maaf' was truly a magical journey from start to finish. Koi Naa is not just a song but a feeling brought beautifully to life on screen by Rajkummar and Wamiqa. I feel truly grateful to have been part of a track so close to my heart. I hope audiences give it as much love as we felt while making it."

Bhool Chuk Maaf is all set to tell the story of Ranjan and Titli’s love urging to uncover the reason behind the endless cycle to set things right and take audiences on a ride of emotions. With a perfect mix of humour, heart, and mystery, the film promises an unforgettable cinematic ride. Catch it in theatres worldwide on May 9, 2025.


Listen to ‘Koi Naa’ from Bhool Chuk Maaf here: bit.ly/KoiNaa


About Sony Music: 

Sony Music Entertainment is a global recorded music company that has on its roster a rich and storied history of iconic artists like Beyonce, Michael Jackson, Shakira, Mariah Carey and Britney Spears and today’s superstars like Harry Styles, Camila Cabello, Travis Scott and Khalid, pan-Indian superstar Raftaar, pop sensation AKASA, new age artists like OAFF-Savera, Mitraz, Talwiinder and South India’s biggest acts like Anirudh, A.R. Rahman, GV Prakash, Yuvan Shankar Raja, Devi Sri Prasad, Thaman S, Vivek-Mervin, Darbuka Siva and Ghibran including several decades-long relationships with Dharma Productions, Maddock Films, Red Chillies Entertainment, Vishesh Films, Madras Talkies, Raaj Kamal Films International. Seven Screen Studio, The Route, Mythri Movie Makers, Vyjayanthi Movies and SVCC among others. On offer is a vast catalogue that comprises some of the most important recordings in history spread across multiple genres, languages, and geographies

NYN Music, Rohit & Donni£ Set the Scene on Fire with “Kiso Toyo”

NYN Music, Rohit & Donni£ Set the Scene on Fire with “Kiso Toyo

 
Watch the song here- https://youtu.be/x5nx8sS9FqY
 
NYN Music (of KitSe fame) is back with another genre-bending banger — “Kiso Toyo” — featuring Rohit and Donni£. The song blends Rajasthani and Haryanvi traditional elements with hip-hop intensity, resulting in something bold, rooted, and completely enticing.
 
With authentic regional flavor and international-level production, Kiso Toyo is a masterclass in folk fusion. NYN Music continues to break boundaries, redefining what it means to blend roots with rhythm. Rohit and Donni£ bring their A-game — spitting verses full of grit, vibe, and unapologetic realness. It’s not just a song, it’s an anthem.
 

Talking more about the song,
NYN Music says,"With ‘Kiso Toyo,’ we wanted to create something that connects generations. The soul of Rajasthani and Haryanvi folk is so rich, and mixing it with hip-hop mix . It’s about showing that our roots can live loud in today’s world."
 
Rohit says ”Kiso Toyo’ is all about identity, heritage, and fully owning where you come from while stepping into who you’re becoming. That raw folk energy mixed with hip-hop gave me the perfect space to express something real — something that speaks to both the soil and the streets”
 
Donni£ says, Kiso Toyo’ is a whole energy — raw, real, and full of vibe. We had an incredible time creating this track, just feeding off each other’s energy in the studio. What makes it truly special is how effortlessly hip-hop blends with the folk sounds. It’s not just a fusion, it’s a celebration of cultures. I hope the audience feels the same rush we did while making it — something fresh, rooted, and full of soul”
 
Whether you’re into indie, folk, desi hip-hop — or just looking for your next Reels flex — Kiso Toyo is the vibe you’ve been waiting for.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...