Friday, August 19, 2016

जस्ट बाय लाइव्ह 2500 पेक्षा अधिक मार्की ब्रँड्ससह भारताचे सर्वात मोठे वितरक बनले
भारताच्या 80 सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड्सना किरकोळ विक्रेत्यांना ऑन बोर्ड आणले
येत्या 100 दिवसांमध्ये 100 हजार किरकोळ विक्रेत्यांसह भागीदारी करण्याची योजना

जगातील ई-वितरणाचे सर्वात पहिले मंच असलेल्या जस्ट बाय लाइव्हने 2500 पेक्षा अधिक मार्की भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह भागीदारी करून भारतातील सर्वात मोठी वितरक बनत एक उत्तुंग यश संपादन केले आहे. प्रतिदिन सरासरी 500 नवे आणि लहान व्यवसाय ऑन बोर्ड घेताना कंपनीने येत्या 100 दिवसांमध्ये अशा एक लाखांपेक्षा अधिक व्यवसायांना त्याच्या सेवा पुरविण्याचा आत्मविश्वास संपादन केला आहे.

जस्ट बाय लाइव्हला एका अतिशय छोट्या कालावधीत किरकोळ विक्रेत्यांच्या समुदायाकडून अद्भुत प्रतिसाद  मिळाला आहे. खाद्यपदार्थ, पेये, पर्सनल केअर, मोबाईल आणि ऑटो यांच्यासारख्या गटांमधील स्पर्धात्मक 2500 ब्रँड्समधून 500,000 पेक्षा अधिक उत्पादने विकताना जस्ट बाय लाइव्हने भारताचे नामांकित असे 80 आणि जगभरातील 100 सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड्स आपल्या छत्राखाली खाली आणले, ज्यात अॅपल, झियाओमी, सॅमसंग, मायक्रोमॅक्स, यू मोबाईल्स, ओप्प्पो, पतंजली, आयटीसी, पीअँडजी, युनिलिव्हर, कोको कोला, पेप्सिको, अमूल, नेसले आणि अन्य भरपूर ब्रँड्सचा समावेश आहे.

हा महत्त्वाचा असा मैलाचा दगड साध्य करण्यावर बोलताना, जस्ट बाय लाइव्हचे चेअरमन आणि सीईओ साहिल सनी म्हणाले, जस्ट बाय लाइव्ह हे किरकोळ विक्रेत्यांना एक मजबूत मंच प्रदान करण्याच्या आणि व्यापक अशा वितरण श्रेणीच्या थेट अभिगम्यतेस सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. यात वितरण उद्योगास लोकतांत्रिक बनविण्याच्या, त्यात अमुलाग्र बदल घडवीत त्याचा विस्तार करण्याची दूरदृष्टी देखील सामील आहे. चांगली बातमी ही आहे की आम्ही आत्ता वेग पकडीत आहोत. किरकोळ विक्रेत्यांच्या संस्थेकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर आम्ही अत्यंत खुश आहोत आणि 2016 वर्षाच्या अखेरपर्यंत 5000 ब्रँड्सचे औपचारिक वितरक बनत या संख्येस दुप्पट करण्याचे आमचे ध्येय आहे.

जस्ट बाय लाइव्ह हे एक हाय डेसिबल टीव्ही आणि डिजिटल प्रचारासह सुरु करण्यात आले होते, ज्यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विभागास, म्हणजेच 15 दशलक्ष स्वतःची दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांना आशेच्या एका मजबूत संदेशासह किरकोळ विक्रेत्यांना लक्ष्य बनविणे हे होते. हा मंच सध्या पानवाला ते उडपीज,किराणा दुकाने ते सुपरमार्केट्स, मोबाईल स्टोअर्स ते केमिस्टस अशा 50,000 किरकोळ विक्रेत्यांना सेवा देत आहे. एका बाजूला पारंपारिक आणि क्लिष्ट अशी वितरण प्रणाली आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आक्रमक अशा सूट देण्याच्या प्रचलनासह आधुनिक ई-रिटेलर्स अशा चक्रात असलेले भारतीय किरकोळ विक्रेते अत्यंत चिंतीत आहेत. जस्ट बाय हा पहिला मजबूत असा उपाय आहे जो त्यांना तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे यात कोणतेही आश्चर्य नाही की याने या यंत्रणेत कायमसाठी आपले स्थान मजबूत केले आहे.    

जेव्हा जस्ट बाय सुरु झाले, तेव्हा या स्फोटक अशा आव्हानासाठी ब्रँड्स आणि उत्पादक तयार होतील याची खात्री करणे हे आमचे सर्वात पहिले आव्हान होते. अपेक्षेनुसार, विस्तृत व्याप्ती अॅपद्वारा प्रस्तुत लाभ आणि व्यवसाय आणि ब्रॅड्सच्या मालकांसाठी जीवंत डेटा स्ट्रीम्सची उपलब्धी यांच्यामुळे या कल्पनेला कंपन्यांकडून त्वरित स्वीकारले गेले,” असे साहिल पुढे म्हणाले.

जस्ट बाय लाइव्हमुळे किरकोळ विक्रेत्यांना भरपूर लाभ मिळतात, कारण ते ब्रँड्सच्या व्यापक श्रेणीतून वस्तू निवडू शकतात. ग्राहकांना अधिक चांगल्या निवडी पुरविण्याच्या एका किरकोळ विक्रेत्याची क्षमता त्याच्या यशाच्या संधींना द्विगुणीत करतात. जस्ट बाय अॅपमुळे एखादा किरकोळ विक्रेता त्याचा स्थानिक वितरक पुरवीत असलेल्या ब्रँड्ससह सीमित कक्षेत रहात नाही, तर त्याऐवजी त्याला विनापरिश्रम उत्पादनांची अधिक व्यापक श्रेणी घरपोच मिळू शकते आणि त्याच्या विस्ताराच्या योजनेत एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सोबत, ब्रँड्सद्वारा दिले जाणारे लाभ,ऑफर्स आणि स्कीम्स किरकोळ विक्रेत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि सर्वाधिक लाभ देणारी उत्पादने निवडून किरकोळ विक्रेते त्यांच्या महसुलात वाढ करू शकतात आणि तसेच, त्यांना वाटल्यास ते त्यांच्या किमतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. 


जस्ट बाय सुरु करण्याची एकदम योग्य वेळ, ई-कॉमर्स क्षेत्रातील त्याचा अद्वितीय असा बिजनेस-टू-बिजनेस मंच जो ब्रँड्स आणि किरकोळ विक्रेत्यांना जोडतो आणि दोघांमधील विश्वास राखतो. हे सर्व केवळ एकाच गोष्टीकडे खुणावते 100 हजार हा आकडा एका रोमांचक प्रवासातील केवळ एक मैलाचा दगड आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

श्रीवर पुन्हा कोसळला संकटाचा डोंगर, शुभ्राचा कट यशस्वी

 श्रीवर पुन्हा कोसळला संकटाचा डोंगर, शुभ्राचा कट यशस्वी कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ मध्ये आणखी एक रोमांचक वळण आले आहे. श्री...