Saturday, June 9, 2018

प्रिया बापट 'गोदरेज नं.१ एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा'

गोवा मराठी चित्रपट महोत्सव शुभारंभ!

मुंबई, ९ जून २०१८:- चित्रपटांची जादू जिथे कल्पनांना चालना देते आणि तुमचा दृष्टीकोन व्यापक बनवते, अशा विश्वात जाण्यासाठी सज्ज व्हा. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे! चित्रपट प्रदर्शन, मान्यवरांची उपस्थिती, थेट सादरीकरण आणि तीन दिवसांच्या अमर्याद सळसळत्या उत्साहाचे साक्षीदार होण्याची ही अनोखी संधी आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाबद्दल गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारियाम्हणाले, यावर्षी प्रिया बापट यांना ‘गोदरेज नं.१ एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यासाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवासारखे उत्तम व्यासपीठ कोणते असू शकते? कायम नवी उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील असलेली, स्वत:च्या प्रतिमेबद्दल सदैव जागरूक असलेली आणि स्वतंत्र अशा आजच्या आधुनिक स्त्रिचे प्रतिनिधित्व प्रिया बापट करते.’

विन्सान वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि गोवा मराठी फिल्म महोत्सवातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांचे आयोजक/क्युरेटर संजय साठ्ये म्हणाले, ‘विन्सान वर्ल्ड ही एक एकीकृत संपर्क एजन्सी असून योग्य ब्रॅण्ड आणि प्रेक्षक एकमेकांशी जोडलेले असतील, तर, गोदरेजसारखा ब्रॅण्ड प्रस्थापित होऊ शकतो, तसेच नवे ब्रॅण्ड देखील प्रेक्षकांची विश्वासर्हता प्राप्त करू शकतात, असे आम्ही कायम मानतो. गोवा मराठी चित्रपट महोत्सवानिमित्त चोखंदळ प्रेक्षक एकत्र येतात आणि ‘गोदरेज नं.१लाही याच माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.’

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Actors Share Their Favorite Seasonal Drinks!

  Actors Share Their Favorite Seasonal Drinks! As winter’s chill embraces the nation, the season awakens a longing for warm, comforting beve...