विविध श्रेणीतील
रेफ्रिजरेटर्स सादर करीत
जर्मनीतील
‘लीभेर’ कंपनीचा
भारतीय बाजारपेठेला ‘हॅलो
·
ग्राहकांसाठी १९ विविध श्रेणीतील
फ्रीज २३ हजार ५०० रुपयांपासून उपलब्ध
·
जर्मन फ्रीजमधील तंत्रज्ञान
भारतीय बाजारपेठेशी मिळतेजुळते
·
विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स
देशातील ५० शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध
मुंबई, ६ जून २०१८ : जर्मनीतील रेफ्रिजरेटर निर्मिती क्षेत्रातील
प्रख्यात ‘लीभेर’ कंपनीने आज भारतीय बाजारपेठेसाठी आपली विविध उत्पादने लॉंच केली. या कंपनीचे विविध श्रेणीतील फ्रीज भारतामधील दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा रीजन्सच्या महत्त्वाच्या सर्व शहरांमधील विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार
आहेत. या रेफ्रिजरेटर्सच्या श्रेणीची सुरुवात २३ हजार ५०० रुपयांपासून सुरू होणार असून
‘टॉप एन्ड’ श्रेणीतील मॉडेलची किंमत १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे.
ही सर्व उत्पादने औरंगाबाद येथील ‘लीभेर’ कंपनीच्या फॅक्टरीमध्ये निर्मिली जात आहेत. गेल्या महिन्यामध्ये
या फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले होते.
‘लीभेर’ प्रॉडक्ट्स भारतीय बाजारपेठेच्या पसंतीस उतरण्यामागची काही प्रमुख कारणे म्हणजे त्यांची
विशेष रचना. तसेच तब्बल ३ वर्षांच्या संशोधनानंतर या उपकरणामधील जर्मन तंत्रज्ञान भारतीय
बाजारपेठेस लागू पडले आहे. या कंपनीने २२० लिटर क्षमतेपासून ते ४४२ लिटर क्षमतेपर्यंतचे
१९ मॉडेल्सचे रेफ्रिजरेटर्स बाजारात आणले आहेत. या रेफ्रिजरेटर्समध्ये‘सेंट्रल पॉवर कुलिंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रेफ्रिजरेटरला ‘बीइइ’चे ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग मिळाले आहे. तसेच भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा
तसेच त्यांच्या सांस्कृतिक आवडीनिवडी लक्षात घेऊन इतर श्रेणीतील रेफ्रिजरेटर्सची रचना
करण्यात आली आहे. हे सर्व रेफ्रिजरेटर्स ग्राहकांच्या आवडीनिवड लक्षात घेऊन ‘स्टेनलेस स्टील फिनीश’, ‘ब्ल्यू लॅंडस्केप’ आणि ‘रेड बबल’ या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. ‘लीभेर’ कंपनीने हे विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स ग्राहकांपर्यंत
पोचण्यासाठी वितरणाचे उत्तम जाळे तयार केले आहे. हे रेफ्रिजरेटर्स देशातील ५०हून अधिक
शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध होणार आहेत.
‘लीभेर अप्लायन्सेस इंडिया प्रा.
लि.’चे मुख्य विक्री अधिकारी श्री.
राधाकृष्ण सोमय्याजी यावेळी म्हणाले, “ ‘लीभेर’ने कायमच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्यावर
भर दिला आहे. आमच्या कंपनीने जर्मन तंत्रज्ञानाचा अंगिकार करीत भारतीय ग्राहकांच्या
आवडीनिवडीला साजेसे असे रेफ्रिजरेटर्स भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. हे रेफ्रिजरेटर्स
उत्कृष्ट ‘स्पाइकबॉक्सेस’, ‘अल्ट्रा प्रोटेक्टिव्ह व्हेरिओसेफ’, ‘युनिक कुलपॅक’ या फिचर्सने नटले आहेत. भाज्यांची विभागणीदेखील यात करता येणे शक्य
आहे. विशेष म्हणजे या रेफ्रिजरेटर्ससाठी वीजेचा कमीत कमी उपयोग केला जाणार आहे.”
‘लीभेर’ या ब्रॅण्डच्या भारतामधील प्रवासाबद्दल श्री. सोमय्याजी
म्हणाले, “ ‘ली भेर अप्लायन्सेस इंडिया’ या प्रकल्पाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. ‘Engineered in Germany, designed for India’ या कल्पनेवर या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. ग्राहक
हाच आमच्या केंद्रस्थआनी आहे. ‘लीभेर’मध्ये आम्ही कायम उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात
घेऊन त्यांच्या समाधानाला प्राधान्य देतो.”
‘लीभेर’चे रेफ्रिजरेटर्स जून २०१८च्या दुसऱ्या आठवड्यापासून
भारतामधील विविध शहरांच्या शो-रुम्समध्ये उपलब्ध होतील. या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी
एक अनोखी मोहिम आखण्यात आली आहे. त्यामध्ये ‘प्रेस कॅम्पेन’बरोबरच उत्कृष्ट डिजीटल कॅम्पेन, विभागवार आऊटडोअर प्रसिद्धी आणि ‘बीटीएल’चा समावेश आहे. आपली जागतिक पातळीवर कस्टमर सर्व्हिस राखण्यासाठी ‘लीभेर’ने सर्व ठिकाणी सर्व्हिस सेंटर चालू केले आहेत. १८०० २३३३ ४४४ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक ग्राहकांसाठी चालू झाला असून ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या शंकांचे समाधान या क्रमांकावर करता
येईल.
‘लीभेर’ ग्रुप बद्दल
: ‘लीभेर’ हा समूह ५० देशांमध्ये कार्यरत असून त्याच्या १३० कंपनीज
आहेत. बहुतेक सर्व खंडांमध्ये या ग्रुपचे अस्तित्व असून त्यामध्ये ४४ हजार कर्मचारी
कार्यरत आहेत. ‘लीभेर’ची एकूण वार्षिक उलाढाल ९.८ अब्ज युरो एवढी आहे. या ‘ग्रुप’चे विकेंद्रीकरण करण्यात आले असून काही युनिट्सना स्वतंत्र
दर्जा देण्यात आला आहे. जमिनीवरची यंत्रे, खाण, मोबाइल क्रेन्स, टॉवर क्रेन्स, कॉंक्रेट तंत्रज्ञान, समुद्रामधील क्रेन, एअरोस्पेस आणि वाहतूक पद्धत, मशिन टुल्स, स्थानिक उपकरणे, कॉम्पोनंट्स आणि हॉटेल्स आदी क्षेत्रात हा ग्रुप कार्यरत
आहे. या ‘ग्रुप’ची मुख्य कंपनी आहे - ‘लीभेर इंटरनॅशनल एजी.’ या कंपनीचे भागधारक हे ‘लीभेर’ कुटुंबीयांचे सदस्य आहेत. ‘ली भेर-इंटरनॅशनल एजी’ ही कंपनी स्वित्झर्लंडमधील बुले येथे स्थित आहे.
‘लीभेर’ डोमेस्टिक
अप्लायन्सेबद्दल :
इंजिनिअर हान्स लीभेर यांनी
१९५४ मध्ये जर्मनीतील ओस्सेनहॉसेन येथे ही कंपनी स्थापन केली. गेल्या साठहून अधिक वर्षांमध्ये
स्थानिक आणि खासगी क्षेत्रांसाठी विविध पद्धतीच्या रेफ्रिजरेटर्सची निर्मिती करण्यात
ही कंपनी आघाडीवर आङे. सध्याच्या काळात दरवर्षी या कंपनीच्या विविध प्लॅंटमधून २२ लाख
उपकरणांची निर्मिती केली जाते. ‘डोमेस्टिक प्रॉडक्ट अप्लायन्सेस’ विभागातर्फे रेफ्रिजरेटर्स आणि फ्रीजर्सची चार देशांमध्ये
निर्मिती केली जाते. औरंगाबाद येथील प्रकल्पामुळे या कंपनीच्या निर्मिती प्रकल्पांची
संख्या पाचवर जाऊन पोचली आहे. या कंपनीची विभागीय नियंत्रण कंपनी ली ‘भेर-हौसरेट’ आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST