Tuesday, December 17, 2019

एकाच अंतरपटात झाली भालेराव कुटुंबातील चारही भावांची लग्नं
सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत गेले अनेक दिवस बरेच ट्विस्ट अनुभवायला मिळत आहेतशेतकरी कुटुंबातल्या चार तरुण मुलांची लग्नं जुळवण्याभोवती रचलेलं कथानक आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलांच्या लग्नाचा उचललेला विडा याभोवती गेले कित्येक दिवस मालिका फिरत होतीअखेर या चौघांच्या लग्नाची गोड बातमी घेऊन रुक्मिणीबाई आपल्या भेटीला येत आहेतकाटे कुटुंबातल्या चारही मुलींची लग्न भालेराव कुटुंबातल्या चार मुलांशी होणार आहेतविशेष म्हणजे ही लग्नं एकाच मांडवात होणार आहेतआजवर मालिका विश्वात एखाद्या लग्नाचा घाट घातलेला आपण पाहिला असेल मात्र एकाच मांडवात चार लग्नं होण्याची ही पहिलीच वेळ आहेसोनी मराठीवरल्या मालिकेत पहिल्यांदाच चार भावांची लग्नं एकाच मांडवात लागणार आहेत.
                ‘आता तरी ठरलं पाहिजेघर सुनांनी भरलं पाहिजे’ ही एकच इच्छा असणाऱ्या रुक्मिणीबाईंचा आपल्या उपवर मुलांसाठी वधू शोधण्यासाठीचा संघर्ष  सुरू झालाउदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायाची निवड करणाऱ्या प्रत्येक मुलाची ही कथा आहेआपल्या शेतात धान्य पिकवून मानवजातीचं पोट भरणारा बळीराजा स्वतःच्या गरजा मात्र भागवू शकत नाहीइतरांप्रमाणे आपलंही लग्न व्हावं ही त्याची साधी अपेक्षा पूर्ण होत नाहीभालेराव कुटुंबही त्यांपैकीच एकहल्ली मुलींना नोकरी करणारामहिनाअखेरीस बऱ्यापैकी मिळकत असणारा मुलगा नवरा म्हणून हवा असतोअशाच तरुणांचं प्रतिनिधित्व रुक्मिणीबाईंच्या थोरल्या मुलानंप्रभाकरनं केलं आहेशेती व्यवसाय करून पोट भरणऱ्या तरुणांची ही व्यथा ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेतून पाहायला मिळत आहेआपल्या मुलांच्या लग्नासाठी त्यांचा आईनं विवाहसंस्थांचे उंबरे झिजवलेउपवासपूजा-अर्चा असे सगळे सोपस्कार केलेतरी या माउलीच्या मुलांची लग्न जुळत नव्हतीशेतकरी असणाऱ्या प्रभाकरलाही केवळ शेती व्यवसाय करणार असल्यामुळे कित्येकदा नकाराला सामोरं जावं लागलंअखेर सगळे अडथळे पार करत भालेराव-काटे कुटुंबाची भेट झाली आणि मालिकेला नवं वळण मिळालंभेटी झाल्यामनं जुळली आणि हो-नाही म्हणता-म्हणता या दोन कुटुंबांची सोयरीक जुळलीसून घरात आणण्याची रुक्मिणीबाईंची इच्छा आता पूर्ण होत आहेएक नाही दोन नाही तर चक्क चार-चार सुना रुक्मिणीबाईंच्या घराचं माप ओलांडणार आहेतही लग्नं जुळण्याच्या प्रवासात कैक अडथळ्यांचे डोंगर भालेराव आणि काटे कुटुंबीयांनी पार केले आहेतआता जुळलेली ही लग्नं सुखरूप पार पडतील की एखादं नवं विघ्न या मंडळींसमोर उभं ठाकेलहे काही सांगता येत नाही. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ मालिकेतल्या या लग्नसोहळ्यात भालेरावांच्या चारही मुलांची लग्नं एकाच मांडवात होणार आहेतगंमत म्हणजे या चौघांसमोर एकच अंतरपाट धरला जाणार आहेलग्न असो वा इतर पूजाकाही जुन्या परंपरांमध्ये बदल घडवण्याची गरज आहेयाचं भान ठेवत आपणच पिकवलेलं धान्य अक्षतांच्या नावाखाली वाया जाऊ नयेम्हणून शेतकरी असणाऱ्या प्रभाकरनं अक्षता म्हणून तांदूळ  वापरण्याचा निर्णय घेतला आहेया सकारात्मक बदलाला इतरांचा पाठिंबाही लाभला आहेबऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बोहल्यावर चढायला सज्ज झालेले नवरदेव घोड्यावरून नाही तर ट्रॅक्टरवरून येणार आहेततर मुलींचा घरात होणारा  मेहंदी समारंभ तर दोन्ही लग्नघरात होणारा हळदी समारंभ या विवाहसप्ताहात पाहायला मिळणार आहेतट्रॅक्टरवरून येणाऱ्या या वरातीत तुम्हीही सहभागी व्हा आणि नक्की पाहा विवाहसोहळा ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ! विवाहसप्ताह १६ डिसेंबरपासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर!!


Disclaimer: The integrity and security of e-mail communication cannot be guaranteed via the public Internet as information can be intercepted, corrupted, lost, destroyed, arrive late or contain viruses. SPN hereby disclaims any liability for the correct and complete transmission of the information contained in e-mail messages or for any delay in its receipt. If verification of the content of any e-mail communication is required, please request a hard copy version of the e-mail from the original sender. Any views or opinions expressed in the e-mail are solely those of the author and do not necessarily represent those of SPN. While SPN endeavor’s to check all incoming and outgoing messages for the presence of computer viruses, neither SPN nor the sender will accept any responsibility for viruses or malicious code embedded in e-mail messages and we highlight that it is the recipient’s responsibility to scan or otherwise check the content of e-mail messages for the presence of the same. This communication is intended to be read-only by the individual or entity to which it is addressed, and may contain information that is privileged, confidential and exempt from disclosure under applicable law. If the recipient of this communication is not the intended recipient, or the employee or agent responsible for delivering the message to the intended recipient, you are hereby notified that any dissemination, distribution or copying of this communication is strictly prohibited. If you have received this communication in error, please notify the sender immediately and destroy all copies, both electronic and otherwise, of this message forthwith.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF

  A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF SPEARHEADED BY TEJASWINI KOL...