Thursday, January 13, 2022

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे १०० भाग पूर्ण

 सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली'  मालिकेचे १०० भाग पूर्ण


महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे.

 

ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही या मालिकेला खास पसंती मिळतेय.

 

या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे.

 

१७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.

 

पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली' सोम.-शनि., संध्या ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...