Saturday, January 15, 2022

ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार ‘मीडियम स्पाइसी’ हा मराठी चित्रपट

 ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार ‘मीडियम स्पाइसी’ हा मराठी चित्रपट


राठी चित्रपट मीडियम स्पाइसी’ यशाची शिखरं गाठत चालला आहे. नॉर्वे बॉलीवूड फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झाल्यानंतरडॅलस / फोर्ट वर्थ साउथ एशियन चित्रपट महोत्सव आणि त्यानंतर रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून चित्रपटाची निवड करण्यात आली होती. आता या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 16 आणि 19 जानेवारीला ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीडियम स्पाइसी दाखवण्यात येणार आहे.

 

मोहित टाकळकर दिग्दर्शितविधि कसलीवाल निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकरललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या कलाकारांसह सागर देशमुखनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरइप्शितातसेच दिग्गज कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुणे आणि मुंबईत चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट शहरी जीवनातील नातेसंबंधप्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते.



लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कसलीवाल म्हणतात, “आमचा चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय हे पाहून खूप आनंद होतो. जगाच्या विविध भागांतून असा सकारात्मक प्रतिसाद मिळणे समाधानकारक आहेअमेरिका ते इटली आणि स्कॅन्डिनेव्हिया ते आता बांगलादेश… आम्ही मीडियम स्पाइसी रिलीज करण्याच्या तयारीत असतानामहामारीचा सामना करता करता चित्रपट अडकला. सुदैवाने फेस्टिवल मुळे चित्रपटाच्या प्रवासाला गती मिळाली आहे आणि आता ताकदीने तो पुढे सरकत आहे. आम्हाला आशा आहे की भारतातील प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. सध्या20 व्या ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणे ही सन्मानाची गोष्ट आहे
.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...