इंडियन आयडल मराठीच्या मंचावर स्वप्नपूर्ती, आळंदीच्या चैतन्य देवढेला मिळाली पार्श्वगायनाची संधी!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची दिवसेंदिवस वाढत जातेय. महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते. सातत्याने वाढत जाणारी ही चुरस विजेतेपद कोण घेऊन जाणार हा प्रश्न रसिकांना पडतोय. कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करत असू अजय-अतुल सारखी लोकप्रिय जोडी परीक्षण करते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे. 'मूर्ती लहान पण किर्ती महान' हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर 'माउली' म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. प्रत्येक कलाकाराचं पार्श्वगायक होण्याचं, एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला आवाज देण्याचं स्वप्न असतं. आयडलच्या या मंचावर चैतन्यचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. पार्श्वगायन करण्याच्या चैतन्यच्या प्रवासाला लवकरच सुरुवात होणार आहे.
चुणचुणीत, आत्मविश्वासू, निडर या सगळ्या उपमा चैतन्यला लागू पडतात. गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. चैतन्यच्या सादरीकरणाला झिंगाट परफॉर्मन्स मिळाला असून उत्तमोत्तम गाणी सादर करण्याचा प्रयत्न चैतन्याकडून होत असतो. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय. चैतन्यच्या मेहनतीचं फळ की काय म्हणून इंडस्ट्री मधल्या एका कलाकाराने खुद्द अजय गोगावले यांना फोन करून चैतन्यला गाण्याची ऑफर दिली आहे. इंडियन आयडलचा मंच स्वप्नपूर्तीचा आहे आणि चैतन्यचा स्वप्नपूर्तीचा हा प्रवास आता सुरू झालाय. लवकरच रसिकांना चैतन्यच्या आवाजात एक दमदार गाणं ऐकायला मिळेल, यात शंका नाही.
चैतन्यच्या या सुरेल प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्याची गोड गाणी ऐकण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST