Saturday, April 1, 2023

 ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स बाजारात आणत आहे व्हॅडर, भारतातील पहिली 7 इंची अँड्रॉइड डिसप्ले असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल


मुंबई; मार्च 31, 2023: ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स ह्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनीने, आज, आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरबाइक व्हॅडर बाजारात आणत असल्याची घोषणा केली. ओडिसी व्हॅडर ही 7 इंची अँड्रॉइड डिसप्लेने युक्त अशी भारतातील पहिली मोटरबाइक आहे आणि तिचे नियंत्रण एका अॅपद्वारे तसेच ब्ल्यूटूथ कनेक्टिविटीद्वारे करणे शक्त आहे. व्हॅडर मोटरसायकलचा पल्ला इको मोडवर 125 किलोमीटर आहे आणि अँड्रॉइडवर उपलब्ध असलेल्या ओडिसी ईव्ही अॅपद्वारे तिचे नियंत्रण केले जाऊ शकते. ओडिसी व्हॅडर हे भारतात तयार झालेले अर्थात मेक इन इंडिया उत्पादन असून, 1,09,999* (एक्स-शोरूम अहमदाबाद) एवढ्या स्वागतमूल्याला ते बाजारात आणले जात आहे.  


ओडिसी व्हॅडरला नव्याने विकसित करण्यात आलेल्या ओडिसी ईव्ही अॅपची शक्ती लाभलेली आहे. ह्या अॅपमध्ये बाइक लोकेटर, जिओ फेन्स, इमोबिलायझेशन, अँटि-थेफ्ट, ट्रॅक अँड ट्रेस व लो बॅटरी अॅलर्ट ह्यासारख्या कनेक्टिविटी सुविधांसह, टू-व्हीलर वापरणाऱ्यांसाठी नेव्हिगेशन सोपे करणाऱ्या अन्य अनेक सुविधाही आहेत. ह्या इलेक्ट्रिक मोटरबाइकमध्ये अनेक रोमांचक नवीन सुविधा, नवीन इंजिन तंत्रज्ञाने आहेत आणि ही बाइक मिडनाइट ब्ल्यू, फायरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनॉम ग्रीन व मिस्टी ग्रे अशा पाच नवीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.  

व्हॅडरला 3000 वॉट्स इलेक्ट्रिक मोटरची शक्ती आहे आणि हिचा सर्वोच्च वेग 85 किलोमीटर प्रतितास आहे. बाइकचे प्रवासी, अॅक्सेसरीज ह्यांच्याशिवायचे अर्थात कर्ब वजन 128 किलोग्रॅम आहे. ह्यांत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस), पुढील बाजूस 240 मिलीमीटरचा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिलीमीटरचा डिस्क ब्रेक आहे. चार्जिंग सुलभ व्हावे म्हणून कंपनीने IP67 AIS 156 मंजुरीप्राप्त लिथियम-आयन बॅटरीचा समावेश ह्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये केला आहे. ही बॅटरी 4 तासांत पूर्ण चार्ज होते. AIS -156 मंजुरीप्राप्त बॅटरी पॅकमुळे अतुलनीय वेगवान चार्जिंग होते आणि दैनंदिन प्रवासासाठी ही बाइक अत्यंत भरवशाची ठरते.  


ओडिसी व्हॅडर इलेक्ट्रिक मोटरबाइकमध्ये 7 इंची अँड्रॉइड डिसप्ले, गूगल मॅप्स नेव्हिगेशन, 18 लिटर क्षमतेची प्रचंड साठवणीची जागा, ओटीओ अपडेट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे आणि ही बाइक अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच ही आज उपलब्ध असलेल्या सर्वांत सर्वसमावेशक ई-बाइक्सपैकी एक आहे. एलईडी लायटिंग, रिनजरेटिव ब्रेकिंग ह्यांसारखी प्रगत तंत्रज्ञाने आणि वापरण्यासाठी सोपी अशी बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ह्यांच्यासह व्हॅडरमध्ये अपवादात्मक दर्जाचे सुरक्षितता उपाय व नवीनतम सुविधा आहेत आणि हे सर्व परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध आहे. ह्या अनन्यसाधारण तपशिलांमुळे व्हॅडर बाजारपेठेतील अन्य ईव्हींच्या तुलनेत वेगळी उठून दिसते आणि भविष्यकाळातील पर्यावरणपूरक वाहतुकीच्या धारणा बदलण्याचे काम ही बाइक प्रभावीरित्या कसे करू शकते हेही दाखवून देते.  


ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. नेमिन व्होरा, ह्यावेळी, म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आणि नवोन्मेषकारी मोटरसायकल व्हॅडर सर्वांपुढे आणणे माझ्यासाठी थरारक अनुभव आहे. सर्वांना उपलब्ध होण्याजोगे शाश्वत व परवडण्याजोगे वाहतुकीचे पर्याय पुरवणे हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक जण चालवू शकेल असे परवडण्याजोग्या दरातील उत्पादन निर्माण करणे ही ह्या ध्येयाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान अत्युत्कृष्ट किमतीला बाजारपेठेत आणून, सर्व रायडर्ससाठी, वाहतूक अधिक कार्यक्षम करण्यात व्हॅडर उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते. ओडिसीची नवीन व्हॅडर अखंडित कनेक्टिविटी व शक्तिशाली धावण्याच्या क्षमतांमुळे रायडर्सना त्यांच्या प्रवासावर पूर्ण नियंत्रण मिळवून देईल आणि वाहतुकीचा एक सोयीस्कर तरीही समाधानकारक पर्याय त्यांना देईल.”


ते पुढे म्हणाले, “फेम-II मंजुरीप्राप्त वेगवान मोटरबाइक व्हॅडरसह आमच्याकडे 2023 ह्या वर्षासाठी एक रोमांचक नवीन उत्पादनाची मालिकेचे नियोजन आहे. 2023 सालाच्या तिसऱ्या तिमाहीत इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याची आमची योजना आहे. ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत आमचे डीलरशिप नेटवर्क 150हून वाढवण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे आणि ह्यामुळे आमची विक्री किमान 300 टक्के वाढेल असे आम्हाला अपेक्षित आहे."


ह्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये बॅटरीसाठी 3 वर्षांची वॉरंटी आहे, तर पॉवरट्रेनसाठीही 3 वर्षांची वॉरंटी आहे. 999 रुपये एवढी बुकिंग रक्कम भरून ओडिसी व्हॅडरचे ऑनलाइन बुकिंग करता येईल तसेच कंपनीच्या डीलरशिप नेटवर्कमधील 68 दुकानांमध्येही बुकिंग करता येईल. ओडिसी व्हॅडरची डिलिव्हरी ह्यावर्षीच्या जुलै महिन्यात सुरू होणार आहे.  


मॉडेलचे सुविधाविषयक तपशील खालीलप्रमाणे आहेत.


पॉवरट्रेन

बॅटरी

बॅटरी सुरक्षितता सुविधा


मोटर नॉमिनल पॉवर  

3.00 किलोवॉट

सेल्स


एनएमसी प्रिस्मॅटिक

· स्मार्ट बीएमएस, सीएएन कम्युनिकेशनसह

· अति तापल्यास ऑटो कट-ऑफ व यूजर-अॅलर्ट

पीक (सर्वोच्च) पॉवर  

4.50 किलोवॉट

बॅटरी क्षमता

3.7 केडब्ल्यूएच

कमाल टॉर्क

170 एन/एम

बॅटरी रेटिंग  

आयपी 67

सर्वोच्च वेग  

85

किलोमीटर प्रतितास

मंजुऱ्या

एआयएस 156 मंजुरीप्राप्त

3 / 3

ड्राइव्ह मोड  

3 फॉरवर्ड,

रिव्हर्स आणि पार्किंग मोड

आयओटी कनेक्टेड

· 4 तापमान सेन्सर

· सेल तापमानावर नियंत्रण

· थर्मल पॅड्स  

· प्रेशर रिलीज व्हॉल्व

· टर्मिनल ब्रेक फ्युज

नियंत्रक

सीएएन कम्युनिकेशनसह स्मार्ट नियंत्रण

· लाइव्ह ट्रॅकिंग

· इमिबोलायझेशन

· जिओ-फेन्सिंग

· पैसे व सीओटू उत्सर्जनात बचत

· लो बॅटरी अॅलर्ट




ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडविषयी:


मुंबईस्थित इलेक्ट्रिक व्हेइकल स्टार्ट-अप ओडिसी हा व्होरा ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग आहे. हा एक पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहतूक प्लॅटफॉर्म असून, ग्राहकांसाठी इंटेलिजंट शहरी वाहतुकीचे नवीन युग आणण्याच्या दृष्टीने, जगातील आघाडीच्या ईव्ही सुट्या भागांच्या उत्पादकांसोबत तसेच वाहतूक तंत्रज्ञानाच्या तज्ज्ञांसोबत, समन्वयाने काम करतो. कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स व बाइक्स, सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. ह्यात तरुण ते ज्येष्ठ नागरिक, फॅशनेबल ग्राहक व आरामदायी रायडिंगच्या शोधात असलेल्यांपासून ते व्यग्र व्यावसायिक रायडर्सपर्यंत सर्वांचा समावेश होतो. प्रत्येक उत्पादन हे टिकाऊपणासाठी तसेच खात्रीशीरतेसाठी कठोर चाचण्यांमधून गेले आहे. ओडिसी प्रत्येक ग्राहकाला दर्जा, आराम व शैलीने युक्त असे सर्वसमावेशक उत्पादन परवडण्याजोग्या किमतीत देते. सध्या ब्रॅण्डच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये खालील उत्पादनांचा समावेश आहे:-

 

· इलेक्ट्रिक मोटरसायकल व्हॅडर (7 इंची अँड्रॉइड डिसप्ले, आयओटी, चार ड्राइव्ह मोड्स, 18-लिटर साठवणीची जागा, गूगल मॅप नेव्हिगेशन ह्यांनी युक्त)

· इलेक्ट्रिक बाइक एव्होक्विस (चार ड्राइव्ह मोड्स, कीलेस एण्ट्री, अँटि-थेफ्ट लॉक व मोटर कट-ऑफ स्विचने युक्त)

· इलेक्ट्रिक स्कूटर हॉक (क्रुझ नियंत्रण व म्युझिक सिस्टमने युक्त असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर)

· ईटूगो आणि ईटूगोप्लस (पोर्टेबल बॅटरी, यूएसबी चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर व कीलेस एण्ट्रीने युक्त असलेली इलेक्ट्रिक बाइक)

· इलेक्ट्रिक स्कूटर व्हीटू आणि व्हीटूप्लस (वॉटरप्रूफ मोटर, मोठी बूट स्पेस, ड्युअल बॅटरी व एलईटी लाइट्सने युक्त)

· दुर्गम भागांपर्यंत डिलिव्हरी करणारी इलेक्ट्रिट स्कूटर ट्रॉट (250 किलोग्रॅम्स एवढी लोडिंग क्षमता आणि आयओटीने युक्त)

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

 हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!  रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रप...