Saturday, April 1, 2023

 

सन मराठीवर महाराष्ट्राची महामालिका ‘संत गजानन शेगावीचे’

मालिकांमध्ये नवनवीन वळणं आणि बक्षिसांची लयलूट.

 

सन टिव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी आणि प्रेक्षक यांच्यातील नातं दिवसागणिक दृढ होत आहे. आता सन मराठी घेऊन आले आहेत, 'महाराष्ट्राची महामालिकाहा उपक्रम ज्यात प्रेक्षकांसाठी दर आठवड्याला असणार मनोरंजनाची महामेजवानी आणि सोबत भरघोस बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी.

मागील महिन्यापासून 'महाराष्ट्राची महामालिका’ उपक्रमाला सुरुवात झाली. संत गजानन शेगावीचे’ ही या उपक्रमातील एप्रिल महिन्याची महामालिका असणार आहे. या उपक्रमांतर्गत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'बघा रोजजिंका रोख!ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत दररोज रात्री ९.०० वाजता संत गजानन शेगावीचे मालिकेसंबंधित एक प्रश्न प्रेक्षकांना विचारला जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांनी मालिकेदरम्यान दाखवण्यात येणाऱ्या नंबरवर मिस कॉल देऊन नोंदवायचं आहे. अचूक उत्तर देणाऱ्या १०० विजेत्यांना तब्बल लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यात महामालिकेचे ब्रेक-फ्री भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या आठवड्यात एक पाहुणा कलाकार महापालिकेतून सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर, या उपक्रमाच्या चौथ्या आठवड्यात मालिकेचे अनेक पैलू उलगडताना दिसणार आहेत. म्हणून हा आठवडा महासप्ताह ठरणार आहे. शिवाय, या दरम्यान ही मालिका एक नवं वळण घेणार आहे. मालिकेतील काळ काही वर्षांनी पुढे गेला असून संत गजानन महाराजांच्या भूमिकेत एक नवा दर्जेदार कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महामालिकेच्या या पर्वात कोणता पाहुणा कलाकार संत गजा


नन शेगावीचे’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे पाहणं उत्सुकता वाढवणार ठरणार आहे.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Drama and Comedy on &TV of Bheema, Happu Ki Ultan Paltan, Bhabiji Ghar Par Hai

Don't miss out on Drama and Comedy on &TV of  Bheema,  Happu Ki Ultan Paltan,    Bhabiji Ghar Par Hai   Get ready for a rollercoas...