'द कोकण कॉलेक्टिव्ह' यांनी गायले 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' या मालिकेचे शीर्षकगीत.
निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' असे मालिकेचे नाव असून एक आगळीवेगळी मालिका ३ ऑक्टोबरपासून आपल्या भेटीस येत आहे. महिलांना प्राधान्य देणारी ही मालिका असून या तेंडुलकरांच्या घरात पुरुषांना प्रवेश नाही. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना आवडला आहे. समर आणि सानिका यांच्या या प्रेमकहाणीत काय रंगत येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेचे शीर्षकगीत 'द कोकण कॉलेक्टिव्ह' या समूहाने गायले आहे. या समूहात रसिका बोरकर, कृतिका बोरकर, साक्षी म्हात्रे, निकिता घाटे आणि आरती सत्यपाल या गायिका आहेत. 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' हे मालिकेचे नाव जितके सुंदर आहे तितकेच सुंदर असे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. हे रंगतदार शीर्षकगीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.
या शीर्षकगीताचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे संगीत दिग्दर्शन वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने करण्यात आले आहे. मालिकेच्या पात्रांना साजेशे असे या शीर्षक गीताचे बोल आहेत. मालिकेच्या शीर्षकाला धरून असे हे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. शीर्षक गीताचे बोल आई, माई, ताई, आत्यांचा.. गोडा मसाला! खुमासदार नात्यांचा, गोडा मसाला! असे प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे आहेत. या गाण्याचे शीर्षकगीत अभिषेक खांडेकर यांनी लिहले असून राहुल खाडे आणि तेजस काळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. शिवाय 'द कोकण कॉलेक्टिव्ह' या समूहाने हे गायले आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST