Thursday, October 5, 2023

गायत्री सोहम ही अभिनेत्री साकारणार नकारात्मक भूमिका!

 गायत्री सोहम ही अभिनेत्री साकारणार नकारात्मक भूमिका!

 सोनी मराठी वाहिनी नेहमी निरनिराळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेआता सोनी मराठी वाहिनी दोन नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.


'खुमासदार नात्यांचा गोडा मसालाआणि 'खरंच तिचं काय  चुकलं?'. हे विषय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहेतभिन्नविभिन्न स्वभावांच्या या बहिणी कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येणारहे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेसोबतच  गायत्री सोहम ही अभिनेत्री नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहेदमयंती या व्यक्तिरेखेत ती दिसणार आहेदमयंती ही श्रेयसची आई आहे आणि  गायत्री सोहम ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेदमयंतीच्या लूकची चर्चा फार रंगली आहेदमयंती ही एक यशस्वी उद्योजिका आहे आणि करारी वृत्ती असलेली अशी तिची व्यक्तिरेखा आहेनकारात्मक भूमिका असल्यामुळे दमयंतीचा स्वभाव स्वार्थी असणार आहेकाटकारस्थानी आणि अहंकारी असलेली ही व्यक्तिरेखा गायत्री सोहम कशा प्रकारे साकारणारहे पाहणे उत्सुकतेचे असेलगायत्री पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार  आहे.

आभा आणि कुहू यांच्या आयुष्यात दमयंती येण्याने काय बदल होतील आणि श्रेयस कोणाची बाजू घेणारहे या मालिकेत पाहायला मिळेलआभा आणि कुहू या भिन्न स्वभावांच्या बहिणी आहेतदमयंतीने आखलेल्या कटकारस्थानामध्ये त्या अडकतात काजर अडकल्या तर त्यातून स्वतःची सुटका  कशा प्रकारे करतील.  दमयंती ही महत्त्वाकांक्षी स्वभावाची आहेतिच्या आयुष्यातील तिची जी काही ध्येये आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिची धडपड सुरू आहेआता तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती पसंतीस पडतेहे पाहायला मिळेलपाहायला विसरू नकानवी मालिका, 'खरंच तिचं काय चुकलं?'  ऑक्टोबरपासून सोमते शुक्ररात्री :३० वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...