Thursday, October 5, 2023

CM Eknath Shinde: 'शिवरायांचा छावा' पोस्टर ट्विट करून दिगपाल लांजेकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दिली शुभेच्छा

CM Eknath Shinde: 'शिवरायांचा छावा' पोस्टर ट्विट करून दिगपाल लांजेकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दिली शुभेच्छा

'Shivrayancha Chhava’ Movie: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा मोशन पोस्टर पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले असून या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट शिवराज अष्टकामधून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या समोर मांडणारे लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपाटातून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील न उलगडलेली पानं प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर सादर केलं आणि लिहिलं- धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट #शिवरायांचा_छावा येत्या १६ फेब्रूवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा.
https://x.com/mieknathshinde/status/1709201819480871369?s=20

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या  'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. लांजेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल यांनी ‘शिवरायांचा छावा’या चित्रपटाची घोषणा केली. तसेच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा!' सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. शिवरायांचा छावा सिनेमा पुढच्या वर्षा म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊसाहेबांच्या भुमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकणार आहेत.

याशिवाय विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख असे कलाकार झळकणार आहेत. सिनेमात संभाजी महाराजांची भुमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...