Saturday, October 14, 2023

'खरंच तिचं काय चुकलं?'मध्ये रोशन विचारे प्रमुख भूमिकेत

 'खरंच तिचं काय चुकलं?'मध्ये रोशन विचारे प्रमुख भूमिकेत   सोमते शुक्ररात्री .३० वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारा एक गोड चेहरा म्हणजे रोशन विचारेअलीकडेच आलेल्या 'खरंच तिचं काय चुकलं?' या सोनी मराठीवरील रहस्यमय मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला रोशन पाहायला मिळणार आहेरोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहेश्रेयस अग्निहोत्री... गडगंज श्रीमंत होतकरू तरुण... आभा निवासचा एकुलता एक वारसअशी ख्याती असणारी ही व्यक्तिरेखा रोशन आपल्या अभिनयातून उत्तमरीत्या साकारतो आहे.

       

अग्निहोत्रींच्या
 घरची सून आभाच व्हायला हवीअशी तिच्या आईची इच्छा आहेआभा निवासची खरी मालकीण आभाच आहेहे वेळोवेळी अधोरेखितही केलं गेलं आहेपण श्रेयसच्या मनाची मालकीण कोण आहे.. आभा की कुहू..? हे एक कोडंच आहेआभा निवासशी आभाचा काय संबंध आहेयाचं रहस्य अजूनही उलगडलेलं नसताना आभा आणि कुहू या दोन बहिणींच्या आयुष्यात झालेला श्रेयसचा प्रवेश आणखी पेच वाढवणारा ठरणार आहेश्रेयसच्या येण्यानी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चितमालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन श्रेयस काय रंग भरतोहे बघणं आता रंजक ठरेलअल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी मराठीवरील 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जातोयत्यातले काही छुपे गूढ पत्ते एक-एक करून आपल्या मनाचा ठाव घेणार आहेतपण त्यासाठी तुम्हांला सोनी मराठी वाहिनीवर दररोज सोमते शुक्ररात्री .३० वा. 'खरंच तिचं काय चुकलं?' ही मालिका  चुकता पाहायलाच हवी.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...