घरोघरी वीकेएंड होणार साजरा...पाहायला विसरू नका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा!' टीव्हीसमोर बसूया, सहकुटुंब हसूया७ ऑक्टोबरपासून, दर शनि. आणि रवि. रात्री ९.०० वा. केवळ सोनी मराठी वाहिनीवर.
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि या जत्रेतून भेटणारी कोहली फॅमिली.. लॉली.. सावत्या.. गौऱ्या आणि असे बरेच प्रतिभावंत कल्लाकार आज आपल्याही घरातील एक सदस्यच झाले आहेत. या साऱ्या अजबगजब पात्रांची आपल्याला इतकी सवय झालेली आहे ना की, एक जरी भाग चुकला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आदल्या आठवड्याचं टेन्शन विसरून येणाऱ्या आठवड्याची सुरूवात जर आनंदाने अगदी प्रसन्न करायची असेल तर सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसूया आणि सहकुटुंब हसूया हा एकमेव उपाय आपल्या हाती आहे. हीच बाब हेरून सोनी मराठी आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ७ ऑक्टोबरपासून दर शनि. आणि रवि. रात्री ९.०० वा. आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे.
सोनी मराठी वाहिनी ही नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा मान ठेवत आलेली आहे. नवनवीन उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची कला त्यांना अल्पावधीतच अवगत झाली आहे. आठवड्याभराच्या तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वीकेएंडला म्हणजेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या भेटीस येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी आणि उत्सुकतेची गोष्ट असून या जत्रेतील मंडळी आता प्रेक्षकांचा वीकेएंड हसरा करण्यासाठी सज्ज आहेत. तेव्हा बघायला विसरू नका ७ ऑक्टोबरपासून दर शनि. आणि रवि. रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST