Saturday, February 3, 2024

सई कल्याणकर जोजोच्या भूमिकेत! 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेला रंजक वळण! 'अबोल प्रीतीची अजब कहाणी', महाएपिसोड, रविवार रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

                  सई कल्याणकर जोजोच्या भूमिकेत! 'अबोल प्रीतीची अजब कहाणीमालिकेला रंजक वळण!       अबोल प्रीतीची अजब कहाणी', महाएपिसोडरविवार रात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.


 सोनी मराठीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहेअजिंक्यने साकारलला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला असून राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावाही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहेपण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाहीयाची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहेहे गुपित फार काळ ताणून  धरता आता मालिकेत एन्ट्री होणार आहे जोजोचीजोजो ही राजवीरची लहानपणीची मैत्रीणतिच्या येण्याने मयूरी आणि राजवीर यांच्यामध्ये दुरावा येणार काहे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

                     अभिनेत्री सई कल्याणकर ही जोजोची भूमिका साकारताना दिसणार आहेतिच्या येण्याने मालिकेत वेगळीच रंगत येणार आहेसई कल्याणकर या अभिनेत्रीने या आधी निरनिराळ्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेप्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलेली सई आता जोजो या व्यक्तिरेखेतून 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'  या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतिच्या येण्याने मालिकेत एक वेगळेच वळण येणार आहे

जोजो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात राजवीरला अडकवू शकेल कातिच्या येण्याने मयूरी आणि राजवीर एकमेकांपासून दुरावले जातील कायानिमित्ताने पेरलेल्या या नव्या संकटाला राजवीर-मयूरी कसे सामोरे जातीलजोजोच्या जाळ्यात अडकून राजवीर तिच्या प्रेमात पडेल काहे आपल्याला 'अबोल प्रीतीची अजब कहाणीया मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहता येईल. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी', महाएपिसोडरविवार रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...